दिनविशेष 18 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Dinvishesh 18 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 18 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२००८: हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.
१९९९: गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या वा पोलिस कोठडीतल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई.
१९६३: जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
१९५८: बांग्लादेशचे ब्रोजन दास इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई ठरले.
१९४२: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला.
१९२०: अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार.
१८४१: जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.
आज यांचा जन्म
१९८०: प्रीती जंघियानी - अभिनेत्री
१९६७: दलेर मेहंदी - पंजाबी पॉप गायक
१९५६: संदीप पाटील - भारतीय फलंदाज
१९३४: गुलजार - गीतकार, कवी, लेखक दिग्दर्शक - पद्म भूषण, अकादमी पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार
१९२३: सदाशिव शिंदे - भारतीय क्रिकेटपटू (निधन: २२ जून १९५५)
१९००: विजयालक्ष्मी पंडीत - राजदूत, मुत्सद्दी राजकारणी (निधन: १ डिसेंबर १९९०)
१८८६: बाळूकाका कानिटकर - अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (निधन: १२ नोव्हेंबर १९५९)
१८७२: पं. विष्णू दिगंबर पलुसकर - संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक (निधन: २१ ऑगस्ट १९३१)
१७३४: रघुनाथराव पेशवा - (निधन: ११ डिसेंबर १७८३)
१७००: श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट - मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे (निधन: २८ एप्रिल १७४०)
आज यांची पुण्यतिथी
२०१२: रा. की. रंगराजन - भारतीय पत्रकार आणि लेखक
२००८: नारायण धारप - रहस्यकथाकार (जन्म: २७ ऑगस्ट १९२५)
१९७९: वसंतराव नाईक - महाराष्ट्राचे ४थे मुख्यमंत्री, रोहयो योजनेचे जनक (जन्म: १ जुलै १९१३)
१९४५: नेताजी सुभाषचंद्र बोस - भारतीय आझााद हिंद सेनाचे संस्थापक, क्रांतिकारक (जन्म: २३ जानेवारी १८९७)
१२२७: चंगीझ खान - मंगोल सम्राट