दिनविशेष 18 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Dinvishesh 18 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 18 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२०१५: टेनिसपटू रॉजर फेडररने नोव्हाक जोकोविचला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूर लंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.
१९९३: दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.
१९९२: ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६३: पहल्या पुश-बटण टेलिफोनची सेवा चालू झाली.
१९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उदघाटन झाले.
१९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.
१९३३: प्रभातचा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला.
१९२८: वॉल्ट डिस्ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म.
१९१८: लाटव्हियाने आपण रशियापासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१९०५: लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.
१८८२: अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले.
१८०९: फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.
१४९३: ख्रिस्तोफर कोलंबस यांनी पोर्तो रिको हे बेट पहिल्यांदा पाहीले.
आज यांचा जन्म
१९३५: मनोहरसिंहजी प्रद्युम्नसिंहजी - भारतीय राजकारणी, गुजरातचे आमदार (निधन: २७ सप्टेंबर २०१८)
१९३१: श्रीकांत वर्मा - हिंदी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य
१९१०: बटुकेश्वर दत्त - भारतीय क्रांतिकारक (निधन: २० जुलै १९६५)
१९०१: व्ही. शांताराम - चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते (निधन: ३० ऑक्टोबर १९९०)
आज यांची पुण्यतिथी
२०१६: डेंटन कुली - हृदयरोपण शस्त्रक्रियेचे जनक (जन्म: २२ ऑगस्ट १९२०)
२०१४: सी. रुधराय्या - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते
२०१३: एस. आर. डी. वैद्यनाथन - भारतीय संगीतकार (जन्म: १५ मार्च १९२९)
२००६: सुधांशु - मराठी कथाकार व कवी (जन्म: ६ एप्रिल १९१७)
१९९९: रामसिंह रतनसिंह परदेशी - स्वातंत्र्यसैनिक
१९९८: तारा सिंग हेर - भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक (जन्म: १५ नोव्हेंबर १९३६)
१९९६: कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई - स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे नेते
१९९३: स्वामी विज्ञानानंद - लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक
१९३६: व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: ५ सप्टेंबर १८७२)
१७७२: थोरले माधवराव पेशवे - मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा (जन्म: १६ फेब्रुवारी १७४५)