दिनविशेष 19 जानेवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 19 जानेवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Dinvishesh 19 January 2024 : सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 19 जानेवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००७: सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.

२००६: नासाचे न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित झाले.

१९९६: ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खान यांना मध्य प्रदेशाचा कालिदास सन्मान जाहीर.

१९८६: cbrain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.

१९६८: पहिली यशस्वी हदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.

१९६६: इंदिरा गांधी - यांनी भारताच्या ३ऱ्या पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.

१९५६: देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम जाहीर.

१९५४: कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन.

१९४९: क्यूबाने इस्त्रायला मान्यता दिली.

१९४२: दुसरे महायुद्ध जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.

१९०३: अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.

१८३९: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.

आज यांचा जन्म

१९३५: सौमित्र चट्टोपाध्याय - भारतीय बंगाली दिग्दर्शक, अभिनेते - पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: १५ नोव्हेंबर २०२०)

१९१९: ओमप्रकाश मेहरा - भारतीय एअर मर्शल (निधन: ८ नोव्हेंबर २०१५)

१९०६: मास्टर विनायक - चित्रपट दिगदर्शक, अभिनेते आणि निर्माते

१८९८: वि. स. खांडेकर - भारतीय मराठी कादंबरीकार - पद्म भूषण, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: २ सप्टेंबर १९७६)

१८९२: चिंतामण विनायक जोशी - प्रसिद्ध विनोदी लेखक (निधन: २१ नोव्हेंबर १९६३)

१८८६: सवाई गंधर्व - भारतीय शास्त्रीय गायक (निधन: १२ सप्टेंबर १९५२)

आज यांची पुण्यतिथी

२०००: एम. ए. चिदंबरम - भारतीय उद्योगपती व क्रिकेट प्रशासक (जन्म: १२ ऑक्टोबर १९१८)

१९७८: बिजोन भट्टाचार्य - भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक (जन्म: १७ जुलै १९१७)

१९६०: दादासाहेब तोरणे - मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक (जन्म: १३ एप्रिल १८९०)

१९०५: देबेन्द्रनाथ टागोर - भारतीय तत्त्वज्ञानी (जन्म: १५ मे १८१७)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com