दिनविशेष 21 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 21 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
shweta walge

Dinvishesh 21 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 21 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९७२: दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.

१९७१: भारीतय वायुदलाची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धातील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.

१९६२: भारत चीन युद्ध भारतीय प्रदेशावर आक्रमण करणाऱ्या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.

१९५५: संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.

१९४२: राजा नेने दिग्दर्शित दहा वाजता हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

१९११: संसदेच्या निवडणुकीत उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.

आज यांचा जन्म

१९८७: ईशा करवडे - भारतीय बुद्धीबळपटू

१९२७: शं. ना. नवरे - लेखक (निधन: २५ सप्टेंबर २०१३)

१९२६: प्रेम नाथ - भारतीय अभिनेते (निधन: ३ नोव्हेंबर १९९२)

१९२४: मिल्का प्लानिंक - युगोस्लाव्हिया देशाचे ७वे पंतप्रधान (निधन: ७ ऑक्टोबर २०१०)

१९१०: छ्यान चोंग्शू - चीनी भाषेतील लेखक

१८९९: हरेकृष्णा महाबत - ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री (निधन: २ जानेवारी १९८७)

१६९४: व्हॉल्तेर - फ्रेंच तत्त्वज्ञानी (निधन: ३० मे १७७८)

आज यांची पुण्यतिथी

२०१५: अमीन फहीम - भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी (जन्म: ४ ऑगस्ट १९३९)

१९९६: अब्दूस सलाम - पाकिस्तानी भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल विजेते एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल विजेते एकमेव मुस्लिम - नोबेल पुरस्कार (जन्म: २९ जानेवारी १९२६)

१९७०: सर चंद्रशेखर वेंकट रमण - भारतीय भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: ७ नोव्हेंबर १८८८)

१९६३: चिंतामण विनायक जोशी - प्रसिद्ध विनोदी लेखक (जन्म: १९ जानेवारी १८९२)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com