दिनविशेष 22 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Dinvishesh 22 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 22 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुध्दीबळ विश्वविजेता बनला.
२००५: अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.
१९९७: नायजेरियात मिस वर्ल्ड स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार.
१९९१: डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू.
१९८६: भारतीय क्रिकेटपटूसुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत ३४वे शतक केले.
१९६८: द बीटल्स यांनी द बीटल्स (द व्हाईट अल्बम) प्रकाशित केला.
१९६३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या.
१९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९४८: मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा.
आज यांचा जन्म
१९४८: सरोज खान - हिंदी चित्रपटसृष्टीतील नृत्य कोरियोग्राफर - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (निधन: ३ जुलै २०२०)
१९३९: मुलामसिंह यादव - उत्तर प्रदेशचे १५वे मुख्यमंत्री (निधन: १० ऑक्टोबर २०२२)
१९२२: त्र्यं. वि. सरदेशमुख - साहित्यिक
१९१५: किशोर साहू - चित्रपट अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक (निधन: २२ ऑगस्ट १९८०)
१९१३: लक्ष्मीकांत झा - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ (निधन: १६ जानेवारी १९८८)
१९०९: दादासाहेब पोतनीस - स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार (निधन: २७ ऑगस्ट १९९८)
१८८५: हिराबाई पेडणेकर - भारतीय पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार (निधन: १८ ऑक्टोबर १९५१)
१८८०: केशव लक्ष्मण दफ्तरी - भारतीय ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि विचारवंत (निधन: १९ फेब्रुवारी १९५६)
आज यांची पुण्यतिथी
२०१२: पी. गोविंद पिल्लई - मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते (जन्म: २३ मे १९२६)
२००८: रविंद्र सदाशिव भट - गीतकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३९)
२००६: आसिमा चॅटर्जी - भारतीय रसायनशास्त्र - पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (जन्म: २३ सप्टेंबर १९१७)
२००२: गोविंदभाई श्रॉफ - हैदराबाद मुक्तिसंग्रामचे स्वातंत्रसैनिक
२०००: एच. जे. अर्णीकर - भारतीय अणूरसायनशास्त्रज्ञ (जन्म: ६ ऑक्टोबर १९१२)
१९५७: पार्श्वनाथ आळतेकर - नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक (जन्म: १४ सप्टेंबर १८९७)
१९२०: एकनाथ पांडुरंग रेंदाळकर - कवी व संपादक (जन्म: १ जुलै १८८७)