दिनविशेष 23 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 23 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 23 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 23 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मुलन दिन

२०१२: राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार.

२००५: कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

१९९७: हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.

१९९१: वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.

१९९०: आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

१९६६: लुनार ऑर्बिटर-१ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.

१९१४: पहिले महायुद्ध - जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

आज यांचा जन्म

१९७३: मलायका अरोरा खान - मॉडेल आणि अभिनेत्री

१९६८: कृष्णकुमार कुन्नाथ (केके) - सुप्रसिद्ध भारतीय गायक (निधन: ३१ मे २०२२)

१९४४: सायरा बानू - चित्रपट अभिनेत्री

१९१८: विंदा करंदीकर - श्रेष्ठ कवी - साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: १४ मार्च २०१०)

१८७२: तांगुतरी प्रकाशम - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: २० मे १९५७)

१८५२: राधा गोबिंद कार - भारतीय वैद्य आणि दानकर्ते (निधन: १९ डिसेंबर १९१८)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: एस. व्ही. वेणुगोपन नायर - भारतीय लेखक (जन्म: १८ एप्रिल १९४५)

१९९४: आरती साहा - इंग्लिश खाडी पोहून पार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला जलतणपटू (जन्म: २४ सप्टेंबर १९४०)

१९७५: पं. विनायकराव पटवर्धन - शास्त्रीय गायक (जन्म: २२ जुलै १८९८)

१९७४: डॉ. शंकर दामोदर पेंडसे - मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक (जन्म: २८ फेब्रुवारी १८९७)

१९७१: रतन साळगावकर - मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री (जन्म: २४ जानेवारी १९२४)

१९७१: हंसा वाडकर - मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री (जन्म: २४ जानेवारी १९२४)

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com