दिनविशेष 24 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 24 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

एप्रिल महिना सुरू झाला आहे, तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
shweta walge

Dinvishesh 24 April 2024 : सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे. तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 24 एप्रिल रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१३: ढाका, बांगलादेश मध्ये इमारत कोसळून ११२९ जणांचा बळी गेला आणि २५०० जण जखमी झाले.

१९९३: इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले. सर्व १४१ प्रवाशांची सुखरूप मुक्तता झाली.

१९९०: अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.

१९७०: गाम्बिया देश प्रजासत्ताक बनले.

१९६८: मॉरिशस देशाचा संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) प्रवेश.

१९६७: वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमीर कोमारोव्ह हे मरण पावणारे पहिले अंतराळवीर आहेत.

१८००: जगातील सर्वोत्तम ग्रंथालय लायब्ररी ऑफ काँग्रेसची अमेरिकेत सुरवात.

१७१७: खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.

१६७४: भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला.

आज यांचा जन्म

१९७३: सचिन तेंडुलकर - भारतीय क्रिकेटपटू - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न, अर्जुना पुरस्कार, महाराष्ट्र भूषण

१९७०: डॅमियन फ्लेमिंग - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९४२: जॉर्ज वेला - माल्टा देशाचे १०वे अध्यक्ष

१९३४: जयकानधन - भारतीय पत्रकार आणि लेखक (निधन: ८ एप्रिल २०१५)

१९३४: एडिडा नागेश्वर राव - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (निधन: ४ ऑक्टोबर २०१५)

१८९६: रघुनाथ वामन दिघे - कादंबरीकार (निधन: ४ जुलै १९८०)

१८२३: सेबॅस्टियन लेर्डो डी तेजाडा - मेक्सिको देशाचे अध्यक्ष (निधन: २१ एप्रिल १८८९)

आज यांची पुण्यतिथी

२०१४: शोभाजी रेगी - भारतीय राजकारणी (जन्म: १६ नोव्हेंबर १९६८)

२०११: सत्य साईबाबा - आध्यात्मिक गुरू (जन्म: २३ नोव्हेंबर १९२६)

१९९९: सुधेंदू रॉय - चित्रपट कला दिग्दर्शक

१९७४: रामधारी सिंह दिनकर - देशभक्त व हिंदी साहित्यिक - पद्म भूषण, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: २३ सप्टेंबर १९०८)

१९७२: जेमिनी रॉय - चित्रकार (जन्म: ११ एप्रिल १८८७)

१९६०: अण्णासाहेब भोपटकर - नामवंत वकील लक्ष्मण बळवंत तथा

१९४२: दिनानाथ मंगेशकर - शास्त्रीय गायक (जन्म: २९ डिसेंबर १९००)

दिनविशेष 24 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना
Gold-Silver Rate : दीड महिन्यानंतर सोने-चांदीच्या दरात घसरण, सोने 2 हजार तर चांदी 3 हजारांनी स्वस्त
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com