दिनविशेष 24 ऑगस्ट 2023 :  बहिणाबाई चौधरी यांची जयंती; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 24 ऑगस्ट 2023 : बहिणाबाई चौधरी यांची जयंती; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 24 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 24 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

दिनविशेष 24 ऑगस्ट 2023 :  बहिणाबाई चौधरी यांची जयंती; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त 'या' खास कविता ठेवा स्टेटसला

आज काय घडलं?

आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन

७९: इटलीतील माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक. पॉम्पेई, हर्क्युलेनियम स्टेबी ही शहरे राखेखाली दडपली जाऊन नष्ट.

२००१: सरोद वादक अमजद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.

१९९७: दक्षिण कन्नडा जिल्ह्याचे विभाजन. उडुपी हा स्वतंत्र जिल्हा झाला.

१९९५: मायक्रोसॉफ्टने विंडोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.

१९९१: एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.

१९८०: झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९६६: रशियाचे लुना-११ हे मानव विरहित यान चांद्र मोहिमेवर निघाले.

१९६०: इटलीतील रोम येथे १७व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

१९५०: एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.

१९१९: जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली.

१८९१: थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.

१६९०: कोलकाता शहराची स्थापना.

१६०९: गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.

आज यांचा जन्म

१९४४: संयुक्ता पाणिग्रही - ओडिसी नर्तिका (निधन: २४ जून १९९७)

१९३२: रावसाहेब जाधव - व्यासंगी साहित्यसमीक्षक

१९२७: अंजली देवी - भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या

१९१७: पं. बसवराज राजगुरू - किराणा घराण्याचे गायक

१९०८: शिवराम हरी राजगुरू - क्रांतिकारक (निधन: २३ मार्च १९३१)

१८८८: बाळासाहेब खेर - मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री - पद्म विभूषण (निधन: ८ मार्च १९५७)

१८८०: बहिणाबाई चौधरी - भारतीय निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री (निधन: ३ डिसेंबर १९५१)

१८७२: नरसिंह चिंतामण केळकर - भारतीय साहित्यसम्राट, केसरी वृत्तपत्राचे संपादक (निधन: १४ ऑक्टोबर १९४७)

१८३३: नर्मदाशंकर दवे - गुजराथी लेखक व समाजसुधारक (निधन: २६ फेब्रुवारी १८८६)

आज यांची पुण्यतिथी

२०१९: अरुण जेटली - भारतीय राजकीय नेते - पद्म विभूषण (जन्म: २८ डिसेंबर १९५२)

२०००: कल्याणजी वीरजी शहा - ज्येष्ठ संगीतकार - पद्मश्री (जन्म: ३० जून १९२८)

१९९३: दिनकर बळवंत देवधर - भारतीय क्रिकेटपटू (जन्म: १४ जानेवारी १८९२)

१९९३: दि. ब. देवधर - क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू (जन्म: १४ जानेवारी १८९२)

१९२५: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर - प्राच्यविद्या संशोधक (जन्म: ६ जुलै १८३७)

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com