दिनविशेष 25 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 25 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 25 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 25 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०१२: व्हॉयेजर १ - अंतराळयान आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली.

१९८९: व्हॉयेजर २ - अंतराळयान नेपच्यून ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचले.

१९८१: व्हॉयेजर २ - अंतराळयान शनी ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचले.

१९८०: झिम्बाब्वे - देश संयुक्त राष्ट्रात सामील झाला.

१९३३: डायक्सी भूकंप, चीन - या भूकंपात किमान ९००० लोकांचे निधन.

१८७५: कॅप्टन मॅथ्यू वेब - इंग्रजी चॅनेल पोहून ओलांडणारे पहिले व्यक्ती बनले.

१८३५: पहिला ग्रेट मून होक्स - चंद्रावर जीवन आहे असा शोध जाहीर करणारा लेख न्यूयॉर्क सनमध्ये प्रकाशित झाला.

१६०९: गॅलिलिओ गॅलीली - यांनी त्यांच्या पहिल्या दुर्बीणीचे प्रात्यक्षिक दाखवले.

आज यांचा जन्म

१९९४: काजोल आयकट - भारतीय लेखक आणि कादंबरीकार

१९६९: विवेक राजदान - भारतीय क्रिकेटपटू

१९६५: संजीव शर्मा - भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक

१९६२: डॉ. तस्लिमा नसरीन - बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका

१९४१: अशोक पत्की - संगीतकार

१९३६: गिरिधारीलाल केडिया - इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍण्ड मॅनेजमेंटचे संस्थापक (निधन: १९ डिसेंबर २००९)

१९३०: शॉन कॉनरी - जेम्स बाँडच्या भूमिकांमुळे गाजलेला अभिनेते

१९२३: गंगाधर गाडगीळ - साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ - साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: १५ सप्टेंबर २००८)

१९१६: फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स - अमेरिकन बालरोगतज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: ४ ऑगस्ट २००३)

आज यांची पुण्यतिथी

२०१३: रघुनाथ पनिग्राही - भारतीय गायक-गीतकार (जन्म: १० ऑगस्ट १९३२)

२०१२: नील आर्मस्ट्राँग - चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव (जन्म: ५ ऑगस्ट १९३०)

२००१: डॉ. व. दि. कुलकर्णी - संत साहित्याचे अभ्यासक समीक्षक

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com