दिनविशेष 25 जुलै 2023 : पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांचा शपथविधी

दिनविशेष 25 जुलै 2023 : पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांचा शपथविधी

सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. तर जुलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Dinvishesh 25 July 2023 : सध्या जुलै महिना सुरू झाला आहे. तर जुलै महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 25 जुलै या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१६४८: आदिलशहाच्या आज्ञेवरून शहाजीराजे यांना कैद केले.

१७९९: नेपोलियन बोनापार्टने ईजिप्तमधील अबु किर जवळ ओट्टोमन सैन्याचा पराभव केला.

१९०७: कोरिया जपानच्या आधिपत्याखाली आले.

१९०८: किकुने इकेदाने मोनोसोडियम ग्लुटामेट(आजिनोमोटो)चा शोध लावला.

१९२५: सोवियेत संघाची वृत्तसंस्था तासची स्थापना.

१९५६: अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली.

१९७८: जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊनचा इंग्लंडमधील लॅंकेशायर येथे जन्म.

१९८४: सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्तोस्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर.

१९९७: के. आर. नारायणन भारताचे १० वे, पहिले दलित आणि पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.

२००७: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा शपथविधी

आज यांचा जन्म

१८७५: जिम कॉर्बेट - ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक (मृत्यू: १९ एप्रिल १९५५)

१९१९: सुधीर फडके - गायक संगीतकार (मृत्यू: २९ जुलै २००२)

१९२२: वसंत बापट - कवी, वक्ते, कलावंत, संपादक (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२)

१९२९: सोमनाथ चटर्जी - लोकसभेचे सभापती आणि माकप नेते (मृत्यू: १३ ऑगस्ट २०१८)

१९७८: लुईस ब्राऊन - पहिली मानव टेस्टट्यूब बेबी

आज यांची पुण्यतिथी

१८८०: गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका - समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते (जन्म: ९ एप्रिल १८२८)

१९७७: कॅ. शिवरामपंत दामले - महाराष्ट्रीय मंडळ, पुणे संस्थापक (जन्म: १४ एप्रिल १९००)

२०१२: बी. आर. इशारा - चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)

२०१५: आर. एस गवई - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: ३० ऑक्टोबर १९२९)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com