दिनविशेष 26 ऑगस्ट 2023 : मदर तेरेसा यांची जयंती; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 26 ऑगस्ट 2023 : मदर तेरेसा यांची जयंती; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Dinvishesh 26 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 26 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

दिनविशेष 26 ऑगस्ट 2023 : मदर तेरेसा यांची जयंती; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Mother Teresa: महान समाज सेविका मदर तेरेसा यांच्याविषयी जाणून घ्या...

आज काय घडलं?

२०२०: फोर्ब्सच्या यादीनुसार अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस हे २०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक कमाई करणारे पहिले व्यक्ती ठरले.

१९९४: लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर.

१९७२: जर्मनीतील म्युनिच येथे २०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

१८८३: सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३६ गावे उध्वस्त ३६,००० लोकांचा बळी.

१७९१: जॉन फिच यांना स्टीमबोटसाठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले.

१७६८: कॅप्टन जेम्स कूक पहिल्या सफरीवर निघाले.

१४९८: मायकेल अँजेलो याने पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.

१३०३: अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.

आज यांचा जन्म

१९४४: अनिल अवचट - लेखक सामाजिक कार्यकर्ते

१९२८: ओम प्रकाश मुंजाल - हिरो सायकलचे सहसंस्थापक (निधन: १३ ऑगस्ट २०१५)

१९२७: बी. व्ही. दोशी - प्रख्यात वास्तुविशारद

१९२२: ग. प्र. प्रधान - समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक (निधन: २९ मे २०१०)

१९१०: मदर तेरेसा - समाजसेविका - भारतरत्न, नोबेल पुरस्कार (निधन: ५ सप्टेंबर १९९७)

१७४३: आईन्स्टाईन लॅव्हाझियर - आधुनिक रसायनशास्त्राचा जनक (निधन: ८ मे १७९४)

आज यांची पुण्यतिथी

२०१२: ए. के. हनगल - चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक (जन्म: १ फेब्रुवारी १९१७)

१९९९: नरेंद्रनाथ - डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू

१९५५: बालन के. नायर - मल्याळी चित्रपट अभिनेते

१९५५: अ. ना. भालेराव - मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक

१९४८: कृष्णाजी खाडिलकर - नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक (जन्म: २५ नोव्हेंबर १८७२)

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com