दिनविशेष 26 जानेवारी 2024 : प्रजासत्ताक दिन; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 26 जानेवारी 2024 : प्रजासत्ताक दिन; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Dinvishesh 26 January 2024 : सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 26 जानेवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

दिनविशेष 26 जानेवारी 2024 : प्रजासत्ताक दिन; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना
Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिनानिमित्त 'हे' देशभक्तीपर मेसेज करा शेअर

आज काय घडलं?

भारतीय प्रजासत्ताक दिन

२००१: गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले.

१९९८: कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान.

१९७८: महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू.

१९५०: एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

१९४९: भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.

१९४२: दुसरे महायुद्ध अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन.

१९३३: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सुरुवात केली.

१९२४: रशियातील सेंट पीट्सबर्गचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले.

१८७६: मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.

१५६५: विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.

आज यांचा जन्म

१९५७: शिवलाल यादव - क्रिकेटपटू

१९२०: वसंत नायसादराय रायजी - भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट इतिहासकार (निधन: १३ जून २०२०)

१९१९: के. सी. इब्राहिम - भारतीय क्रिकेटपटू (निधन: १२ नोव्हेंबर २००७)

१८९१: चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे - बडोद्याचे राजकवी (निधन: १७ मार्च १९३७)

आज यांची पुण्यतिथी

२०१५: आर. के. लक्ष्मण - व्यंगचित्रकार (जन्म: २४ ऑक्टोबर १९२१)

१९६८: बापूजी अणे - लोकनायक (जन्म: २९ ऑगस्ट १८८०)

१९५४: मानबेंद्रनाथ रॉय - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, क्रांतिकारक (जन्म: २१ मार्च १८८७)

१८३१: संगोली रायन्ना - भारतीय योद्धा (जन्म: १५ ऑगस्ट १७९८)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com