दिनविशेष 27 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 27 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मार्च महिना सुरू झाला आहे, तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
shweta walge

Dinvishesh 27 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 27 मार्च रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०००: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.

१९९२: पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.

१९७७: तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन ऍम आणि के. एल. एम. या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले.

१९६६: २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.

१९५८: निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

१८५४: क्रिमियन युद्ध इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

१७९४: अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.

१६६७: शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले वनाव महंमद कुली खान ठेवले.

आज यांचा जन्म

१९०१: कार्ल बार्क्स डोनल्ड डकचे निर्माते हास्यचित्रकार (निधनः २५ ऑगस्ट २०००)

१८६३: हेन्री रॉयस रोल्स रॉयस लिमिटेडचे सहसंस्थापक (निधनः २२ एप्रिल १९३३)

१७८५: लुई १७ वा फ्रान्सचा राजा (निधनः ८ जून १७९५)

आज यांची पुण्यतिथी

२०००: प्रिया राजवंश - हिंदी चित्रपट अभिनेत्री

१९९७: भार्गवराम आचरेकर - संगीत नाटकातील अभिनेते व गायक

१९९२: शरदचंद्र वासुदेव चिरमुले - साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य

१९७९: फिलिप व्हिन्सेंट - विन्सेंट मोटारसायकल कंपनीचे संस्थापक (जन्म: १४ मार्च १९०८)

१९७८: कुंवर दिग्विजय सिंग - भारतीय फील्ड हॉकीपटू (जन्म: २ फेब्रुवारी १९२२)

१९६७: जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की - झेक रसायनशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: २० डिसेंबर १८९०)

१९५२: काइचिरो टोयोडा - टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक (जन्म: ११ जून १८९४)

१८९८: सर सय्यद अहमद खान - भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते (जन्म: १७ ऑक्टोबर १८१७)

दिनविशेष 27 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना
IPL 2024 MI vs SRH: मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! 'हा' स्टार खेळाडू टीममधून बाहेर
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com