दिनविशेष 29 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 29 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
shweta walge

Dinvishesh 29 May 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 29 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या

आज काय घडलं?

२०२२: ऑल दॅट ब्रीदस् - या भारतीय माहितीपटाने ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गोल्डन आय (L'Oeil d'or) पुरस्कार जिंकला.

२०२२: सिद्धू मूसवाला - पंजाबी गायक यांची गोळ्या घालून हत्या.

२०२२: तारा एअर फ्लाइट १९७ दुर्घटना - हे विमान नेपाळ मध्ये कोसळले. यात असलेले १९ प्रवासी आणि ३ कर्मचारी यांचे निधन.

१९५३: माऊंट एव्हरेस्ट - एडमंड हिलरी व शेर्पा टेन्झिंग नॉर्गे यांनी दुपारी ११:३० वाजता माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शीखर सर केले.

१९१९: अल्बर्ट आइनस्टाइन - यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी घेण्यात आली.

१९१४: आर.एम.एस. इंप्रेस ऑफ आयर्लंड - जहाज बुडून त्यात १९९२ लोकांचे निधन.

१८४८: अमेरिका - विस्कॉन्सिन अमेरिकेचे ३०वे राज्य झाले.

१७२७: पीटर (दुसरा) - रशियाचा झार बनला.

आज यांचा जन्म

१९४०: फारूख लेघारी - पाकिस्तानचे ८वे राष्ट्रपती (निधन: २० ऑक्टोबर २०१०)

१९४०: ताइहो कोकी - ४८वे योकोझुना, जपानी सुमो (निधन: १९ जानेवारी २०१३)

१९२९: पीटर हिग्ज - ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ

१९१७: जॉन एफ. केनेडी - अमेरिकेचे ३५वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २२ नोव्हेंबर १९६३)

१९१४: शेर्पा टेन्झिंग नॉर्गे - एडमंड हिलरी यांच्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट शीखर सर करणारे गिर्यारोहक (निधन: ९ मे १९८६)

१९०६: टी. एच. व्हाईट - भारतीय-इंग्लिश लेखक (निधन: १७ जानेवारी १९६४)

१९०५: हिराबाई बडोदेकर - किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका (निधन: २० नोव्हेंबर १९८९)

आज यांची पुण्यतिथी


२०२२: सिद्धू मूसवाला - पंजाबी गायक (जन्म: ११ जून १९९३)

२०१०: ग. प्र. प्रधान - समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक (जन्म: २६ ऑगस्ट १९२२)

२००७: स्नेहल भाटकर - संगीतकार (जन्म: १७ जुलै १९१९)

१९९५: मार्गारेट चेस स्मिथ - यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि युनायटेड स्टेट्स सिनेट या दोन्ही ठिकाणी सेवा देणाऱ्या पहिल्या महिला (जन्म: १४ डिसेंबर १८९७)

१९८७: चौधरी चरण सिंग - भारताचे ५वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक (जन्म: २३ डिसेंबर १९०२)

१९७९: मेरी पिकफोर्ड - अमेरिकन चित्रपटसृष्टीतील अग्रणी कलाकार (जन्म: ८ एप्रिल १८९२)

१९७७: सुनीतिकुमार चटर्जी - भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक (जन्म: २६ नोव्हेंबर १८९०)

१९७२: पृथ्वीराज कपूर - भारतीय कलाकार व राजकारणी - दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: ३ नोव्हेंबर १९०१)

१८९२: बहाउल्ला - बहाई पंथाचे संस्थापक (जन्म: १२ नोव्हेंबर १८१७)

१८२९: सर हंफ्रे डेव्ही - इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १७ डिसेंबर १७७८)

१८१४: जोसेफिन डी बीअर्नार्नास - नेपोलियन बोनापार्ट यांची पहिली पत्नी (जन्म: २३ जून १७६३)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com