आज काय घडले : अणूऊर्जा आयोगाची स्थापना

आज काय घडले : अणूऊर्जा आयोगाची स्थापना

सुनील छेत्री यांचा जन्म, सरोजिनी वैद्य यांचे निधन
Published by :
Team Lokshahi
Published on

सुविचार

चांगल्या माणसांवर एवढा विश्वास ठेवा, जेवढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता

आज काय घडले

  • १९०० मध्ये अमेरिकन टायर कंपनी ‘द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी’ ची स्थापना करण्यात आली.

  • १९४८ मध्ये भारतीय अणूऊर्जा आयोगाची स्थापना झाली. होमी जहाँगीर भाभा हे या आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.

  • १९६० मध्ये नायजेरियाला फ्रांसकडून स्वातंत्र्य मिळाले.

आज यांचा जन्म

  • आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचा १८९८ मध्ये जन्म झाला.

  • स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, प्रति सरकारचे संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांचा १९०० मध्ये जन्म झाला.

  • भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील उर्दू कवी व गीतकार शकील बदायुनी यांचा १९१६ मध्ये जन्म झाला.

  • पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या घराण्यातील शास्त्रीय ठुमरी गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचा १९३६ मध्ये जन्म झाला.

  • क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू बलविंदरसिंग संधू यांचा १९५६ मध्ये जन्म झाला.

  • पद्मश्री व अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय व्यावसायिक फुटबॉलपटू व कर्णधार सुनील छेत्री यांचा १९९४ मध्ये जन्म झाला.

आज यांची पुण्यतिथी

  • विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचे १९३० मध्ये निधन झाले.

  • हिन्दुस्तान टाइम्सचे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव देवदास गांधी यांचे १९५७ मध्ये निधन झाले.

  • अध्यात्म नेते आणि अद्वैत वेदांत, भगवद्गीता, उपनिषद प्रसारक स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचे १९९३ मध्ये निधन झाले.

  • लेखिका, समीक्षिका सरोजिनी वैद्य यांचे २००७ मध्ये निधन झाले. ललितलेखन, चरित्रलेखन, समीक्षा या साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com