दिनविशेष 3 ऑगस्ट 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Dinvishesh 3 August 2023 : सध्या ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 3 ऑगस्ट या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२००४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, अमेरिका - ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर पुन्हा उघडण्यात आले.
२०००: शाजी एन. करुण - मल्याळी दिग्दर्शक, यांना फ्रेन्च सरकारने नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केले.
१९९७: स्काय टॉवर, ऑकलंड, न्यूझीलंड - या दक्षिण गोलार्धातील सर्वात उंच फ्री-स्टँडिंग इमारतीचे उदघाटन.
१९९४: अनिल विश्वास - संगीतकार, यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
१९७७: TRS-८० कॉम्पुटर - टँडी कॉर्पोरेशन कंपनीने जगातील पहिल्या मोठ्या प्रमाणात विकलेल्या वैयक्तिक संगणकांची घोषणा केली.
१९४८: भारतीय अणूऊर्जा आयोग (Indian Atomic Energy Commission) - स्थापना झाली.
१९३६: आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.
१८११: जंगफ्राऊ शिखर - या बर्नीज आल्प्स पर्वतरांगेतील तिसरे सर्वोच्च शिखराची जोहान रुडॉल्फ आणि हायरोनिमस मेयर यांनी पहिली चढाई केली.
१७८३: माउंट असामा ज्वालामुखी उद्रेक, जपान - या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे किमान ३५ हजार लोकांचे निधन.
आज यांचा जन्म
१९८४: सुनील छेत्री - भारतीय फुटबॉलपटू - पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न
१९६०: गोपाल शर्मा - भारतीय क्रिकेटपटू
१९५६: बलविंदरसिंग संधू - भारतीय क्रिकेटपटू
१९३९: अपूर्व सेनगुप्ता - भारतीय क्रिकेटपटू
१९००: क्रांतिसिंह नाना पाटील - स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकीय नेते (निधन: ६ डिसेंबर १९७६)
१८९८: उदयशंकर भट्ट - आधुनिक हिंदी नाटककार आणि कादंबरीकार (निधन: २८ फेब्रुवारी १९६६)
१८८६: मैथिलिशरण गुप्त - भारतीय हिंदी कवी - पद्म भूषण (निधन: १२ डिसेंबर १९६४)
आज यांची पुण्यतिथी
२०२२: मिथिलेश चतुर्वेदी - भारतीय अभिनेते (जन्म: १५ ऑक्टोबर १९५४)
२००७: सरोजिनी वैद्य - लेखिका (जन्म: १५ जून १९३३)
१९९३: स्वामी चिन्मयानंद सरस्वती - भारतीय अध्यात्मिक गुरू (जन्म: ८ मे १९१६)
१९५७: देवदास गांधी - हिंदुस्तान टाइम्सचे संपादक, महात्मा गांधींचे पुत्र (जन्म: २ ऑक्टोबर १९००)
१९३०: व्यंकटेश बापूजी केतकर - आंतरराष्ट्रीय गणिती व ज्योतिर्विद (जन्म: १२ जानेवारी १८५४)