दिनविशेष 31 जानेवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 31 जानेवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Dinvishesh 31 January 2024 : सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 31 जानेवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९५०: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.

१९४९: बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने तत्कालीन मुंबई राज्यात विलीन झाली.

१९४५: युद्धातून पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला.

१९२९: सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.

१९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक याची सुरूवात.

१९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसऱ्यांदा जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.

आज यांचा जन्म

१९७५: प्रीती झिंटा - चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका

१९३१: गंगाधर महांबरे - गीतकार कवी व लेखक (निधन: २३ डिसेंबर २००८)

१८९६: दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे - कन्नड कवी - ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: २१ ऑक्टोबर १९८१)

आज यांची पुण्यतिथी

२००४: व्ही. जी. जोग - भारतीय व्हायोलिनवादक (जन्म: २२ फेब्रुवारी १९२२)

२००४: सुरैय्या - गायिका व अभिनेत्री (जन्म: १५ जून १९२९)

२०००: वसंत कानेटकर - नाटककार (जन्म: २० मार्च १९२०)

२०००: के. एन. सिंग - हिंदी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (जन्म: १ सप्टेंबर १९०८)

१९९४: वसंत जोगळेकर - मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक

१९८६: विश्वनाथ मोरे - संगीतकार

१९६१: कृष्णा सिंह - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: २१ ऑक्टोबर १८८७)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com