दिनविशेष 4 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 4 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by :
shweta walge
Published on

Dinvishesh 4 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 4 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००१: हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी २५ अब्ज डॉलर्सला विकत घेतली.
१९९८: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली.
१९७२: मार्क स्पिटझ हा एकाच ऑलिम्पक स्पर्धेत ७ सुवर्णपदके मिळवणारा पहिला खेळाडू बनला.
१९३७: प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली.
१९०९: लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काऊटचा पहिला मेळावा झाला.
१८८८: जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले.
१८८२: थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिल्या व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालु केले वीजयुगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जातो.

आज यांचा जन्म

१९७१: लान्स क्लूसनर - दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू

१९६४: आदेश श्रीवास्तव - भारतीय गायक-गीतकार (निधन: ५ सप्टेंबर २०१५)

१९६२: किरण मोरे - भारतीय क्रिकेटपटू

१९५२: ऋषी कपूर - अभिनेते

१९४१: सुशीलकुमार शिंदे - महाराष्ट्राचे १५वे मुख्यमंत्री

१९३७: शंकर सारडा - साहित्यिक व समीक्षक

१९३१: अँथनी डी मेलो - भारतीय-अमेरिकन धर्मगुरू आणि मानसोपचारतज्ज्ञ (निधन: २ जून १९८७)

१९२७: जॉन मॅककार्थी - लिस्प प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे जनक (निधन: २४ ऑक्टोबर २०११)

१९२३: राम किशोर शुक्ला - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: ११ डिसेंबर २००३)

१९१३: पी. एन. हक्सर - प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव (निधन: २५ नोव्हेंबर १९९८)

१९०५: वॉल्टर झाप - मिनॉक्सचे शोधक (निधन: १७ जुलै २००३)

१९०१: विल्यम लियन्स जॅग्वोर - जॅग्वोर कारचे सहसंस्थापक (निधन: ८ फेब्रुवारी १९८५)

१८८७: रॅडोजे लजुटोव्हॅक - शत्रूच्या विमानाला जमिनीवरून हवेत गोळ्या घालणारे पहिले व्यक्ती (निधन: २५ नोव्हेंबर १९६८)

१८२५: दादाभाई नौरोजी - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय (निधन: ३० जून १९१७)

१२२१: श्री चक्रधर स्वामी - महानुभाव पंथाचे संस्थापक (निधन: ७ फेब्रुवारी १२७४)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: सायरस पालोनजी मिस्त्री - भारतीय व्यापारी, उद्योगपती (जन्म: ४ जुलै १९६८)

२०२२: रामचंद्रन मोकेरी - भारतीय रंगमंच अभिनेते

२०२२: राम नरेश रावत - भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार (जन्म: ७ मे १९६७)

२०१५: विल्फ्रेड डी डिसोझा - भारतीय सर्जन आणि राजकारणी (जन्म: २३ एप्रिल १९२७)

२०१२: हांक सूफी - भारतीय गायक-गीतकार (जन्म: ३ मार्च १९५२)

२०१२: सय्यद मुस्तफा सिराज - भारतीय लेखक (जन्म: १३ ऑक्टोबर १९३०)

२०००: मोहम्मद उमर मुक्री - विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते (जन्म: ५ जानेवारी १९२२)

१९९७: डॉ. धर्मवीर भारती - हिंदी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार (जन्म: २५ डिसेंबर १९२६)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com