दिनविशेष 5 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 5 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
shweta walge

Dinvishesh 5 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 5 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: लुडिंग काउंटी भूकंप - लुडिंग काउंटी, सिचुआन, चीन मध्ये ६.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपात किमान ६६ लोकांचे निधन तर किमान २५० जण जखमी झाले.
२००५: इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे फ्लाईट ०९१ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.
२०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९८४: एस. टी. एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.
१९७७: व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
१९७५: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्डवर असफल खुनी हल्ला.
१९७२: ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिंपिकमधील इस्राएलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.
१९७०: इटालियन ग्रांप्रीच्या प्रॅक्टिसमध्ये मारल्याच्या घटनेनंतर मरणोत्तर फॉर्मूला वन वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकणारे जोकेन रांड हे एकमेव ड्रायव्हर ठरले.
१९६७: ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले.
१९६१: अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू.
१९६०: रोम मधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्ण पदक जिंकले.
१९४१: इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.
१९३२: बर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली व नायजर या राष्ट्रांत विभाजन.

आज यांचा जन्म

१९८६: प्रग्यान ओझा - भारतीय क्रिकेटर

१९६७: कविता महाजन - भारतीय लेखिका आणि अनुवादक (निधन: २७ सप्टेंबर २०१८)

१९५४: रिचर्ड ऑस्टिन - वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू

१९४८: बी. के. एस. वर्मा - भारतीय चित्रकार (निधन: ६ फेब्रुवारी २०२३)

१९४६: फ्रेडी मर्क्युरी - मूळ भारतीय वंशाचा ब्रिटीश गायक व संगीतकार

१९४०: रॅक्वेल वेल्श - अमेरिकन अभिनेत्री

१९२९: अँड्रियन निकोलायेव - सोव्हियेत युनियनचे अंतराळवीर, मायक्रोग्रॅविटीमध्ये तरंगणारे पहिले व्यक्ती (निधन: ३ जुलै २००४)

१९२८: दमयंती जोशी - सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना - पद्मश्री (निधन: १९ सप्टेंबर २००४)

१९२०: लीलावती भागवत - बालसाहित्यिका (निधन: २५ नोव्हेंबर २०१३)

१९१०: फिरोझ पालिया - भारतीय क्रिकेट खेळाडू

१९०७: जे. पी. नाईक - शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु एज्केशनचे संस्थापक (निधन: ३० ऑगस्ट १९८१)

१९०७: जयंत पांडुरंग नाईक - शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन आणि नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगचे संस्थापक - पद्म भूषण (निधन: १० ऑगस्ट १९८१)

१८९५: अनंत काकबा प्रियोळकर - भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक (निधन: १३ एप्रिल १९७३)

१८८८: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - भारताचे २रे राष्ट्रपती - भारतरत्न (निधन: १७ एप्रिल १९७५)

१८७२: व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: १८ नोव्हेंबर १९३६)

१६३८: लुई (१४वा) - फ्रान्सचा राजा (निधन: १ सप्टेंबर १७१५)

११८७: लुई (८वा) - फ्रान्सचा राजा (निधन: ८ नोव्हेंबर १२२६)

आज यांची पुण्यतिथी

२०२०: जॉनी बक्षी - भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते (जन्म: २ जानेवारी १९३२)

२०१५: आदेश श्रीवास्तव - भारतीय गायक-गीतकार (जन्म: ४ सप्टेंबर १९६४)

२०००: रॉय फ्रेड्रिक्स - वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (जन्म: ११ नोव्हेंबर १९४२)

१९९७: मदर तेरेसा - समाजसेविका - भारतरत्न, नोबेल पुरस्कार (जन्म: २६ ऑगस्ट १९१०)

१९९६: बॅसिल सालदवदोर डिसोझा - भारतीय बिशप (जन्म: २३ मे १९२६)

१९९५: सलील चौधरी - हिंदी व बंगाली संगीतकार (जन्म: १९ नोव्हेंबर १९२२)

१९९२: अतूर संगतानी - उद्योगपती

१९९१: शरद जोशी - हिंदी कवी, लेखक व उपहासकार (जन्म: २१ मे १९३१)

१९७८: रॉय किणीकर - कवी, संवादलेखक, नाटककार व पत्रकार

१९१८: सर रतनजी जमसेठजी टाटा - उद्योगपती (जन्म: २० जानेवारी १८७१)

१९०६: लुडविग बोल्टझमन - ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २० फेब्रुवारी १८४४)

१८७७: क्रेझी हॉर्स - अमेरिकेतील सू जमातीचा नेता

१८७६: मॅन्युएल ब्लॅनको एन्कालदा - चिली देशाचे पहिले राष्ट्रपती (जन्म: २१ एप्रिल १७९०)

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com