दिनविशेष 6 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 6 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
shweta walge

Dinvishesh 6 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 6 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: कोविड-१९ महामारी - भारताने कोविड-१९ अनुनासिक (Nasal Vaccine) लस मंजूर केली आणि चीननंतर असे करणारा दुसरा देश बनला.

२०२२: लिझ ट्रस - युनायटेड किंगडमच्या पंतप्रधान बनल्या.

१९९७: अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खान यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.

१९९३: ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड.

१९६८: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.

१९६६: दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.

१९६५: पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.

१९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.

१९३९: दुसरे महायुद्ध दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

१८८८: चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम.

१५२२: फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.

आज यांचा जन्म

१९७१: देवांग गांधी - भारतीय क्रिकेट खेळाडू

१९६८: सईद अन्वर - पाकिस्तानी फलंदाज

१९५७: जोशे सॉक्रेटिस - पोर्तुगालचे पंतप्रधान

१९२९: यश जोहर - भारतीय चित्रपट निर्माते (निधन: २६ जून २००४)

१९२३: पीटर (दुसरा) - युगोस्लाव्हियाचे राजा

१९२१: नॉर्मन जोसेफ वोंडलँड - बारकोडचे सहनिर्माते (निधन: ९ डिसेंबर २०१२)

१९२१: नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड - बार-कोडचे सहसंशोधक (निधन: ९ सप्टेंबर २०१२)

१९०१: कमलाबाई रघुनाथ गोखले - भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार (निधन: १८ मे १९९७)

१८९२: सर एडवर्ड ऍपलटन - ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार

१८८९: बॅ. शरदचंद्र बोस - स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू (निधन: २० फेब्रुवारी १९५०)

१७६६: जॉन डाल्टन - इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (निधन: २७ जुलै १८४४)

दिनविशेष 6 सप्टेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
जन्माष्टमीला तुमच्या मुलाला बनवायचंय श्रीकृष्ण; 'या' खास पद्धतीने तयारी करा

आज यांची पुण्यतिथी

२०२२: अरविंद गिरी - भारतीय राजकारणी, उत्तर प्रदेशचे आमदार (जन्म: ३० जून १९५८)

२०२२: उमेश कट्टी - भारतीय राजकारणी, कर्नाटकचे आमदार (जन्म: १४ मार्च १९६१)

२०१९: रॉबर्ट मुगाबे - झिम्बाब्वे देशाचे २रे राष्ट्रपती (जन्म: २१ फेब्रुवारी १९२४)

२००७: लुसियानो पाव्हारॉटी - इटालियन ऑपेरा गायक

१९९०: लेन हटन - इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २३ जून १९१६)

१९७९: पी. के. मुकिया तेवर - ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अध्यक्ष (जन्म: ४ एप्रिल १९२३)

१९७८: अडॉल्फ डॅस्लर - ऍडिडासचे संस्थापक (जन्म: ३ नोव्हेंबर १९००)

१९७२: अल्लाउद्दीन खान - जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार

१९६३: गोविंद पै - कन्नड कवी आणि राष्ट्रकवी (जन्म: २३ मार्च १८८३)

१९३८: सली प्रुडहॉम - फ्रेंच लेखक - नोबेल पुरस्कार

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com