दिनविशेष 7 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 7 नोव्हेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 7 November 2023 : सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 7 नोव्हेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००१: बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी सबीना (SABENA) दिवाळखोरीत गेली.

१९९०: मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.

१९५१: एम. पातंजली शास्त्री यांनी भारताचे २ रे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

१९४४: फ्रँकलिन डी. रूझवेल्ट चौथ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

१८७९: वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्या पाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.

१८७५: सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे...! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.

१६६५: सर्वात जुने जर्नल लंडन गॅझेट पहिल्यांदा प्रकाशित झाले.

आज यांचा जन्म

१९८१: अनुष्का शेट्टी - भारतीय अभिनेत्री

१९८०: कार्तिक - भारतीय गायक-गीतकार

१९७५: वेंकट प्रभू - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक

१९७१: त्रिविक्रम श्रीनिवास - भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक

१९६०: श्यामप्रसाद - भारतीय चित्रपट निर्माते

१९५४: कमल हासन - भारतीय तामिळ अभिनेते, निर्माते आणि राजकारणी - पद्म भूषण, पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

१९२२: विद्याबेन शाह - भारतीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (निधन: १९ जून २०२०)

१९१५: गोवर्धन धनराज पारिख - महाराष्ट्रातील विचारवंत वव शिक्षणतज्ञ

१९०३: भास्कर धोंडो कर्वे - शिक्षणशास्त्र, मानस व बालमानस या विषयांचे लेखक

१९००: एन. जी. रंगा - स्वातंत्र्यसैनिक आणि शेतकरी चळवळीतील नेते (निधन: ९ जून १९९५)

१८८८: सर चंद्रशेखर वेंकट रमण - भारतीय भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: २१ नोव्हेंबर १९७०)

१८८४: पांडुरंग सदाशिव खानखोजे - क्रांतिकारक, कृषितज्ज्ञ (निधन: २२ जानेवारी १९६७)

१८६८: मोरो केशव दामले - व्याकरणकार व निबंधकार (निधन: ३० एप्रिल १९१३)

१८५८: बिपिन चंद्र पाल - भारतीय स्वातंत्र्यसेनानी (निधन: २० मे १९३२)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: सर रॉजर भटनागर - भारतीय-न्यूझीलंडचे उद्योजक, न्यूझीलंडमध्ये नाइट पदवी मिळवणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती (जन्म: २६ ऑक्टोबर १९४२)

२०१५: बाप्पादित्य बंदोपाध्याय - भारतीय दिग्दर्शक आणि कवी (जन्म: २८ ऑगस्ट १९७०)

२००९: सुनीता देशपांडे - लेखिका व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ३ जुलै १९२६)

२०००: सी. सुब्रम्हण्यम - गांधीवादी नेते, केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल (जन्म: ३० जानेवारी १९१०)

१९९८: पं. जितेंद्र अभिषेकी - शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक (जन्म: २१ सप्टेंबर १९२९)

१९७८: जीवराज नारायण मेहता - भारतीय डॉक्टर आणि राजकारणी (जन्म: २९ ऑगस्ट १८८७)

१९६३: यशवंत गोपाळ जोशी - मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक (जन्म: १७ डिसेंबर १९०१)

१९४७: के. नतेसा अय्यर - भारतीय-श्रीलंकेचे पत्रकार आणि राजकारणी

१९२३: अश्विनीकुमार दत्ता - भारतीय शिक्षक (जन्म: २५ जानेवारी १८५६)

१९०५: केशवसुत - आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक (जन्म: ७ ऑक्टोबर १८६६)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com