दिनविशेष 7 सप्टेंबर 2023 : दहीहंडी; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

दिनविशेष 7 सप्टेंबर 2023 : दहीहंडी; जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 7 September 2023 : सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 7 सप्टेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

दहीहंडी

१९७९: दिवाळखोरी टाळण्यासाठी ख्रायसलर कॉर्पोरेशन ने अमेरिकन सरकारकडे १.५ बिलियन डॉलर्सची मागणी केली.

१९७८: मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.

१९३१: दुसऱ्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

१९२३: इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.

१९०६: बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.

१८१४: दुसऱ्या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.

१६७९: सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.

१६३०: बोस्टन, अमेरिका-बोस्टन गाव म्हणून प्रस्थापित करण्यात आले.

आज यांचा जन्म

१९६७: आलोक शर्मा - भारतीय-इंग्लिश अकाउंटंट आणि राजकारणी

१९४०: चंद्रकांत खोत - लेखक व संपादक

१९३४: बी. आर. इशारा - चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक (निधन: २५ जुलै २०१२)

१९३३: इला भट्ट - समाजसेविका, सेवा संस्थेच्या संस्थापिका - पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: २ नोव्हेंबर २०२२)

१९२५: भानुमती रामकृष्ण - तामिळ व तेलगू अभिनेत्री (निधन: २४ डिसेंबर २००५)

१९१५: डॉ. महेश्वर नियोग - प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: १३ सप्टेंबर १९९५)

१८८७: गोपीनाथ कविराज - भारतीय संस्कृत विद्वान - पद्म विभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (निधन: १२ जून १९७६)

१८४९: बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर - हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक (निधन: ८ फेब्रुवारी १९२७)

१८२२: भाऊ दाजी लाड - प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ (निधन: ३१ मे १८७४)

१७९१: उमाजी नाईक - भारतीय आद्द क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक (निधन: ३ फेब्रुवारी १८३२)

आज यांची पुण्यतिथी

२०२२: रामचंद्र मांझी - भारतीय लोकनर्तक

२०२०: गोविंद स्वरूप - भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञ (जन्म: २३ मार्च १९२९)

२०२०: अक्किनेनी नागार्जुन - दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते (जन्म: २९ ऑगस्ट १९५९)

१९७९: जे. जी. नवले - कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक (जन्म: ७ डिसेंबर १९०२)

१९५३: बी. रघुनाथ - लेखक, कवी (जन्म: १५ ऑगस्ट १९१३)

१९५३: भगवान रघुनाथ कुळकर्णी - मराठी कवी आणि लेखक (जन्म: १५ ऑगस्ट १९१३)

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com