दिनविशेष 8 जानेवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

दिनविशेष 8 जानेवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Dinvishesh 8 January 2024 : सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 8 जानेवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.

२०००: लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

१९६३: लिओनार्डो डा व्हिन्सी यांच्या मोनालिसाचे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.

१९५७: गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली.

१९४७: राजस्थान विद्यापीठ - सुरुवात.

१९४०: दुसरे महायुद्ध - ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.

१८८९: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले.

१८८०: सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.

१८३५: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.

आज यांचा जन्म

१९४५: प्रभा गणोरकर - मराठी लेखिका

१९४४: सुनील कांती रॉय - भारतीय उद्योजक - पद्मश्री (निधन: ८ मे २०२२)

१९३९: नंदा - अभिनेत्री

१९३६: ज्योतिंद्रनाथ दिक्षीत - परराष्ट्रसचिव व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (निधन: ३ जानेवारी २००५)

१९३१: तरुण मजुमदार - भारतीय चित्रपट दिग्दर्शक - पद्मश्री (निधन: ४ जुलै २०२२)

१९२९: सईद जाफरी - अभिनेते

१९२६: केलुचरण महापात्रा - भारतीय ओडिसी नर्तक - पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (निधन: ७ एप्रिल २००४)

१९२५: राकेश मोहन - हिंदी नाटककार (निधन: ५ डिसेंबर १९७३)

१९२४: गीता मुखर्जी - स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या (निधन: ४ मार्च २०००)

१९०९: आशापूर्णा देवी - लेखिका - ज्ञानपीठ पुरस्कार

आज यांची पुण्यतिथी

२०१३: अलेसदैर मिल्ने - भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: ८ ऑक्टोबर १९३०)

१९९५: मधु लिमये - समाजवादी विचारवंत (जन्म: १ मे १९२२)

१९९४: चंद्रशेखर सरस्वती - ६८वे शंकराचार्य परमाचार्य

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com