'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊन सेलिब्रेट करा दिवाळी पाडवा

'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊन सेलिब्रेट करा दिवाळी पाडवा

अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.
Published on

Diwali Padwa 2023 : अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. दिवाळी पाडव्याच्याच दिवशी बलिप्रतिपदा पूजेला विशेष महत्व असते. या सणानिमित्त आपल्या नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना खास शुभेच्छा देऊन साजरा करा.

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!

उत्तम दिनाचे महात्म्य आहे!

सुखद ठरो हा छान पाडवा,

त्यात असूदे अवीट गोडवा!

बलिप्रतिपदा, पाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा

सुमुहूर्तावरी पाडव्याच्या एकात्मतेचे लेणे लेऊया, भिन्न विभिन्न असलो तरी सर्व मनाने एक होऊया...

दीपावली पाडवा व बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा

नवा सुगंध, नवा ध्यास, नव्या रांगोळीची नवी आरास,

स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे..

दिवाळी पाडवाच्या लख्ख लख्ख शुभेच्छा..!

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आली आज दिवाळी

पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाट

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो..

बलिप्रतिपदा,

दिपावली पाडव्याच्या खूप-खूप शुभेच्छा!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com