Indira Gandhi Birth Anniversary : माजी पंतप्रधान इंदिरा गांधींविषयीच्या न ऐकलेल्या गोष्टी...

Indira Gandhi Birth Anniversary : माजी पंतप्रधान इंदिरा गांधींविषयीच्या न ऐकलेल्या गोष्टी...

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी इलाहाबाद या ठिकाणी झाला. त्यांच्या बालपणीच्या काही गोष्टी आपण जाणून घेऊया...
Published by :
Team Lokshahi

इंदिरा गांधींच्या घरी होती कडक शिस्त

इंदिरा गांधी यांच्या घरी लहानपणापासूनच शिस्तप्रिय वातावरण होते त्यामुळेच इंदिरा गांधी यांच्या सबंध आयुष्यात शिस्तीचे वर्तन आपणाला पाहण्यास मिळते. शिस्तीच्या वातावरणामुळेच इंदिरा गांधी यांच्या शालेय जीवनात त्यांच्यावर अभ्यासूवृत्ती विकसित करण्याचे संस्कार झाले. इंदिराजींना कोणतेही काम वेळेवर आणि वेळेत करण्याची सवय होती कदाचित हेच त्यांच्या बालपणीच्या शिस्त प्रिय वातावरणाचे प्रतीक असावे .

लहानपणी इंदिराजींना होती लहान मुलांना गोळा करून भाषण द्यायची आवड

इंदिरा गांधी यांचे वडील राजकीय नेते होते तसेच त्यांच्याघरी महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल यांची ये जा होती त्यामुळे राजकारणाचा प्रभाव होता. इंदिरा गांधी आपल्या बालमित्रांना एकत्रित बोलवून त्यांच्या समोर भाषण देत असत. त्यातूनच त्यांची भाषणाची आवड जोपासली गेली असे म्हणले जाते.

असहकार चळवळीने इंदिरा गांधी झाल्या होत्या प्रभावित

इंदिरा गांधी या महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलनाने प्रभावित झाल्या होत्या त्यांनी त्या बालपणीच्या वयात परदेशी उची वस्त्रे परिधान करणे सोडून खादीची पांढरी वस्त्रे घालणे सुरु केले होते इतकंच नाही तर त्या कॉन्व्हेंट स्कुलमध्ये शिकत होत्या त्या ठिकाणी सर्व मुले खूप चांगली कपडे घालून येत असत त्याठिकाणीही इंदिराजी खादीची कडपे परिधान करून जात असत.

इंदिरा आजोबांची होती लाडकी नातं

इंदिरा गांधी या मोतीलाल नेहरू यांच्या खूपच लाडक्या होत्या. मोतीलाल नेहरू यांच्या संदर्भात असे सांगितले जाते कि मोतीलालजी हे खूप रागिष्ट स्वभावाचे होते परंतु त्यांच्या संदर्भात लोक खोट बोलतात आजोबा माझ्यावर कधीच रागवत नाहीत असे इंदिराजी लहानपणी सर्वांना सांगत असत.

इंदिरा गांधी यांच्या कडे होते तीन वाघ

इंदिरा गांधी यांच्या घरी तीन वाघ होते होते त्यांच्या घरी यांना सामान्य प्राण्या सारखेच सांभाळले जात असे त्या वाघांवर इंदिरा गांधी यांचा विशेष जीव होता असे सांगितले जाते. भीम,भेरम हिडींबा अशी अनोखी नवे त्या तीन वाघांची ठेवण्यात आली होती.

इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्व हे धाडसी आणि तेजस्वी होते. त्यांच्या व्यक्तिमत्वांकडून खूप काही शिकण्या सारख्या गोष्टी आहेत. अशा हिंमतवान आणि धाडसी पंतप्रधान भारताला लाभल्या हे भारताचे सदभाग्यचं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com