संत गजानन महाराज यांचा आज 145 वा प्रकट दिन; शेगावात भक्तांची गर्दी
Admin

संत गजानन महाराज यांचा आज 145 वा प्रकट दिन; शेगावात भक्तांची गर्दी

आज संत गजानन महाराज यांचा 145 वा प्रकट दिन आहे.

आज संत गजानन महाराज यांचा 145 वा प्रकट दिन आहे. बुलढाण्यातील शेगावात लाखो भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते. महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान गजानन महाराज यांच्यामुळे नावारुपाला आले आहे. गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे माहित नाही. परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी अर्थातच शके 1800 म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजी सर्वप्रथम प्रकटले होते.

श्री गजानन महाराज प्रकट दिन दरवर्षी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्राच्या अस्त होत असताना सातव्या दिवशी साजरा केला जातो. 'गण गण गणात बोते'चा गजर, अभिषेक, पालखी, मंत्रघोषात संपूर्ण शेगाव दुमदुमन जाते. लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहेत.

श्री गजानन महाराज प्रकट दिन हा एक शुभ दिवस मानला जातो. या दिवशी शेगाव इथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकांचे पूजन केले जातात. शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात आज दिवसभर अनेक धार्मिक कार्यक्रम असणार आहेत. सकाळी सात वाजता आरतीने या कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com