Teachers Day: शिक्षक दिनानिमित्त द्या 'या' खास शुभेच्छा...
एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाला किंवा भविष्याला योग्य वळण देण्यात गुरूचा मोठा वाटा असतो. माणसाला जीवनाचा योग्य मार्ग निवडण्याची समज फक्त गुरुचं देऊ शकतो. यशाच्या पायऱ्या गाठण्याचा हा एकमेव मार्ग आहे. यामुळेचं आपल्या देशात शिक्षकांचा आदर केला जातो आणि त्यांना पालकांपेक्षा वरचा दर्जा दिला जातो. गुरूचे महत्त्व दर्शविण्यासाठी भारतात दरवर्षी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा विशेष दिवस शिक्षकाचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. शिक्षक दिनानिमित्त तुम्ही आपल्या गुरुजनांना या खास शुभेच्छा देऊ शकता....

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः॥
शिक्षक दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा!

विद्येविना मती गेली..
मती विना नीती गेली नीतिविना गती गेली
गती विना वित्त गेले वित्ताविना सारे खचले..
इतके अनर्थ एका अविद्येने केले या
अविद्येचा काळोख ठेवून विद्या
रुपी प्रकाश देणाऱ्या..
शिक्षक दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा!

काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडू ची अक्षरे उमटवत
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा!

गुरूशिवाय ज्ञान नाही
अणि ज्ञानाशिवाय जगात सन्मान नाही
शिक्षक दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा!

शिक्षणापेक्षा मोठे कोणतेच वरदान नाही,
आणि गुरूचा आशीर्वाद मिळणे
यापेक्षा मोठा सन्मान नाही.
शिक्षक दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा!