Guru Purnima 2023: 'या' खास शुभेच्छाद्वारे द्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

Guru Purnima 2023: 'या' खास शुभेच्छाद्वारे द्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

शिष्य आपल्या गुरूंच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. तुम्ही तुमच्या जीवनातील गुरुंना मेसेज, सोशल मीडिया स्टेटसद्वारे शुभेच्छा द्या...
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Guru Purnima 2023: या वर्षी गुरुपौर्णिमा 3 जुलै रोजी सोमवारी साजरी केली जात आहे. गुरु पौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण आहे, जो गुरुंची उपासना करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी समर्पित आहे. हा सण आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. तुम्ही तुमच्या जीवनातील गुरुंना मेसेज, सोशल मीडिया स्टेटसद्वारे शुभेच्छा द्या...

Guru Purnima 2023: 'या' खास शुभेच्छाद्वारे द्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा
Guru Purnima 2023: गुरुपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' चुका

गुरु ब्रह्मा गुरु विष्णु

गुरु देवो महेश्वरा

गुरु साक्षात परब्रम्ह

तस्मै श्री गुरवे नमः

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर क्षणा-क्षणाला भेटलेल्या आणि भेटणाऱ्या त्या माझ्या असंख्य गुरुंना शतशः वंदन!

गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम

आणि अखंड वाहणारा झरा

गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

गुरु जगाची माऊली, सुखाची सावली,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

आई-वडील प्रथम गुरु त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरू

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!!!

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com