World day against child labour 2024: "जागतिक बालमजुरी विरोधी दिन 2024" जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

World day against child labour 2024: "जागतिक बालमजुरी विरोधी दिन 2024" जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

गरिबी हे बालमजुरीचे सर्वात मोठे कारण आहे. त्यामुळे मुलांना मजूर म्हणून काम करावे लागत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

गरिबी हे बालमजुरीचे सर्वात मोठे कारण आहे. त्यामुळे मुलांना मजूर म्हणून काम करावे लागत आहे. गरिबी समूळ नष्ट व्हायला अजून बरीच वर्षे जावी लागतील, पण बालमजुरी थांबवण्यासाठी अनेक संस्था प्रयत्न करत आहेत. त्यात काही प्रमाणात यशही आले आहे. या दिवसाचा उत्सव कसा आणि केव्हा सुरू झाला, त्याचे महत्त्व जाणून घेऊया.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) प्रथम बालमजुरी रोखण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर 2002 मध्ये सर्वानुमते एक कायदा संमत करण्यात आला. ज्या अंतर्गत 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना बालकामगार बनवणे हा गुन्हा मानला गेला. आंतरराष्ट्रीय कामगार संघाचे (ILO) 187 सदस्य देश आहेत. ILO ने जगातील कामगार परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक अधिवेशने पारित केली आहेत. शिवाय ते मजुरी, कामाचे तास, अनुकूल वातावरण इत्यादी बाबींवर आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे देत राहते. 1973 मध्ये, आयएलओ कन्व्हेन्शन क्र. 138 स्वीकारून लोकांचे लक्ष रोजगारासाठी किमान वयावर केंद्रित करण्यात आले. ज्याचा उद्देश सदस्य राष्ट्रांना रोजगाराचे किमान वय वाढवणे आणि बालमजुरी दूर करणे हा होता.

बालमजुरीमध्ये गरिबी हे सर्वात मोठे आहे. त्यामुळे मुले शिक्षणाचा पर्याय सोडून सक्तीची मजुरी करण्याचा पर्याय निवडतात. याशिवाय अनेक मुलांना संघटित गुन्हेगारी रॅकेटमुळे बालमजुरी करण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे जागतिक स्तरावर हा दिवस साजरा करण्याचा उद्देश या गोष्टींकडे लोकांचे लक्ष वेधून घेणे हा आहे. जेणेकरून मुलांना बालमजुरीपासून रोखता येईल.

अनेक सरकारे, स्थानिक अधिकारी, नागरी समाज, ना-नफा संस्था बालकामगारांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आणि बालकामगारांना मदत करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे परिभाषित करण्यासाठी सेमिनार आणि इतर कार्यक्रम आयोजित करतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com