जागतिक नारळ दिवस का साजरा केला जातो, जाणून घ्या

जागतिक नारळ दिवस का साजरा केला जातो, जाणून घ्या

दरवर्षी 2 सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो.
Published by :
Team Lokshahi

दरवर्षी 2 सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. नारळाची बहुमुखी उपयुक्तता आणि त्याची मागणी लक्षात घेऊन, 2 सप्टेंबर 1969 रोजी एशियन आणि पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी सुरू झाली. जकार्ता, इंडोनेशियात या दिवशी APCCची स्थापना देखील झाली.आपल्या देशात अनेक शतकांपासून नारळाचे आध्यात्मिक आणि औषधी मूल्य आहे. याला जर निसर्गाने दिलेली भेट म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. नारळाच्या प्रत्येक भागाला खूप महत्त्व आहे. हे उशीरा पचवणारा, मूत्राशय साफ करणारा, ग्रहण करणारा, पौष्टिक, शक्तिशाली, रक्ताविरोधी, जंतुनाशक, जंतुनाशक आणि वात-पित्त नष्ट करणारा आहे. त्याच्या थंड प्रभावामुळे, त्याचे पाणी सर्व शारीरिक समस्यांपासून आराम देते.

नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. त्यापासून निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टी या मनुष्याला उपयोगी पडतात. नारळ हा त्यापैकीच एक. नारळाचा उपयोग खाण्यासाठी, ओषधांसाठी, तेलासाठी तसेच इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. नारळाच्या शेतीपासून जगातल्या अनेक देशांत चांगला रोजगार मिळत आहे. त्यामुळे नारळाचे महत्व आणि त्याचा वापर याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 2 सप्टेंबर हा जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक नारळ दिन हा सर्वप्रथम 2009 साली एशिया-पॅसिफिक प्रदेश म्हणजे आशिया-प्रशांत महासागराच्या प्रदेशातील समुदायाकडून साजरा करण्यात आला. जागतिक स्तरावर नारळाच्या शेतीबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे हा उद्देश जागतिक नारळ दिन साजरा करण्यामागे आहे. त्यामुळे नारळाच्या व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल.

जगभरात नारळाचे उत्पादन घेतले जाते, पण आग्नेय आशियात त्याचे सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. नारळाच्या उत्पादनाच्या बाबतीत इंडोनेशियाचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारतातही कोकण किनारी, गुजरात पासून ते केरळपर्यंत आणि पूर्व किनाऱ्याच्या पश्चिम बंगालपासून ते तामिळनाडूपर्यंत नारळाचे उत्पादन घेतलं जातं.

नारळाचे फायदे

अगदी तहान भागवण्यापासून ते फर्निचर तयार करण्यापर्यंत नारळाचे असंख्य असे फायदे आहेत. नारळामध्ये कार्बोहायड्रेट्स, मॅगनिज आणि प्रोटिन मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे आपले आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. म्हणूनच आजारी व्यक्तींना नारळाचे पाणी प्यायचा सल्ला दिला जातो. नारळाचे दूध आणि तेल हे आपल्या त्वचेला ग्लो आणण्यासाठी फायदेशीर आहे. नारळामध्ये आयर्न आणि सेलेनियम असते. ते एक अॅन्टिऑक्सिडन्ट स्वरुपात काम करते, त्यामुळे लाल रक्त पेशींचे संरक्षण होते. तसेच नारळ खाल्याने कोलेस्टोरॉलचा स्तर सुधारतो. नारळात व्हिटॅमिन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक असतात. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. नारळाचे पाणी रोज पिल्यास शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण स्थिर राहतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com