Netaji Subhash Chandra Bose Jayanti Marathi Bhashan: नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण; जाणून घ्या

Netaji Subhash Chandra Bose Jayanti Marathi Bhashan: नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण; जाणून घ्या

आज देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे महान नायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 128 वी जयंती आहे. संपूर्ण देश हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करतो.
Published by :
Team Lokshahi

आज देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे महान नायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 128 वी जयंती आहे. संपूर्ण देश हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करतो. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, जय हिंद अशा अनेक घोषणांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात नवी ऊर्जा भरणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिशा येथे झाला. नेताजींचे जीवन आणि देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान आजही तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. यासाठी आपण आज भाषण पाहणार आहोत.

मराठी भाषण

भारताच्या स्वतंत्र लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1887 ला ओडिसा राज्यातील कटक शहरात असलेल्या एका बंगाली हिंदू परिवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'जानकी नाथ बोस' व आईचे नाव 'प्रभावती' होते. जानकी नाथ हे कटक शहरातील प्रसिद्ध वकील होते. प्रभावती आणि जानकी नाथ बोस यांना 14 अपत्य होती. ज्यात 6 मुली व 8 मुले होते. सुभाष चंद्र हे त्यांचे 9 वे पुत्र संतान होते.

नेताजींनी आपले प्रारंभिक शिक्षण कटक मधील रेवेनशा कॉलेजियेट स्कूल मधून पूर्ण केले. त्या नंतरचे त्यांचे शिक्षण कोलकात्यातील के प्रेजिडेंसी कॉलेज आणि स्कॉटिश चर्च कॉलेज मध्ये झाले. नेताजींनी 15 वर्षाच्या लहान वयातच स्वामी विवेकानंदांचे सर्व साहित्य वाचून टाकले. कॉलेज मधील शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांच्या आई वडिलांनी, इंडियन सिव्हिल सर्व्हिस च्या तयारी साठी त्यांना इंग्लंड मधील केब्रिज विश्व विद्यालयात पाठून दिले. इंग्रज शासनाच्या काळात भारतीयांना सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाणे फार कठीण होते परंतु तरीही नेताजींनी सिव्हिल सर्व्हिस च्या परीक्षेत चौथ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले.

1938 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर त्यांनी राष्ट्रीय योजना आयोग ची सुरुवात केली. पण ही नीती गांधीवादी आर्थिक विचारांच्या अनुकूल नव्हती. 1939 मध्ये नेताजींनी पुन्हा एकदा गांधीवादी प्रतिद्वंद्वीला हरवून विजय प्राप्त केली. नेताजींची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर, गांधीजींने म्हटले की सुभाष चंद्र बोस यांची विजय माझी पराजय आहे आणि यानंतर असे वाटायला लागले की गांधीजी काँग्रेस वर्किंग कमिटी मधून लवकरच राजीनामा देऊन देतील. गांधीजींच्या या विरोधामुळे शेवटी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतः काँग्रेसला सोडून दिले.

तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा

नारा देऊन पुकारले नेताजींनी जनतेला !

जमवून शूर-वीर भारत भू - च्या पुत्रांना

हादरा दिला जुलमी इंग्रजी सत्तेला

मराठी निबंध

ज्या सुभाषबाबूंनी मोठ्या पगाराच्या, भौठ्या पदाच्या नौकरीवर पाणी सोडून देशसेवेत वाहून नेले,ज्यांनी ब्रिटिशांच्या शत्रुदेशांशी संपर्क करून जागतिक स्तरावरून स्वातंत्र्यासाठी अथक प्रयत्न कैले, आजही राष्ट्रीय नारा म्हणून ओळखला जातो जो 'जय हिंद' हा नारा प्रथम ज्यांनी दिला, ज्यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून प्रथम संबोधले असे गांधीजींच्याच शब्दांत देशभक्तांचे देशभक्त' असे महान क्रांतिकारक सुभाष चंद्र बोस यांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांततेचा ऐकावे ही नम्र विनंती.

आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदणीय गुरुजनवर्ग आणि असंख्य क्रांतिकारकांच्या देशभक्तीच्या आणि बलिदानाच्या संस्कारांनी पवित्र अशा भारतभुमीत जन्मलेले माझ्या बंधू आणि भगिणींनो, भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पराक्रमी इतिहासात डोकावले तर काही असामान्य महापुरूषांची नावे काही क्षणात डोळ्यांसमोर येतात यांपैकी एक महान नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस.. आपल्या प्रभावी विचारांनी, तेजस्वी वक्तृत्वाने आणि लढाऊ बाणा अंगिकारत ब्रिटिश राजवटीला सळो की पळो करून सोडणारे एक वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस...अशा तेजस्वी आणि त्यागी सुभाषबाबूंच्या जीवनकार्याला कोटी कोटी प्रणाम...!

त्यांनी कलकत्यातील आपले शिक्षण पूर्ण केल्या. नंतर पुढील उच्च शिक्षण इंग्लंडला घेतले. त्यांनी कुशाग्र बुद्धिमत्ता व कठोर परिश्रमाला अभ्यासाची जोड दिली. त्यामुळे ते आय.सी.एस. परीक्षा पास झाले. त्यांनी इंग्रजांची नोकरी पत्करली पण त्यात त्यांचे मन रमले नाही. तेथील नोकरी सोडून ते मायदेशी परतले. मायदेशी आल्यानंतर गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. स्वातंत्र्यचळवळीत भाग घेण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा देणारे ते पहिले आय.सी.एस. अधिकारी होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com