Annabhau Sathe Birth Anniversary : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण; जाणून घ्या मुद्दे

Annabhau Sathe Birth Anniversary : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण; जाणून घ्या मुद्दे

तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी सातार्‍यातील वाळवा तालुक्यात त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी ३५ कादंबर्‍या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य आणि १९ पोवाडे रचले आहेत.

तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. अकलेची गोष्ट (1945), देशभक्त घोटाळे (1946), शेटजींचे इलेक्शन (1946), बेकायदेशीर (1947), पुढारी मिळाला (1952), लोकमंत्र्यांचा दौरा (1952) ही त्यांची काही लोकनाट्य होत. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे दहा ओळी मराठी भाषण निबंध

सन्माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय प्राचार्य, सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आज आपण येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित आहोत भरपूर प्रमाणात कथा, कादंबन्या, लावणी, पोवाडे लिहून मराठी साहित्यात आपले अढळ स्थान निर्माण केले. ज्यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली, ज्यानी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम अशा चळवळीमध्ये महत्वाचे योगदान दिले. अण्णाभाऊंचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे १ ऑगस्ट १९२० रोजी एका अस्पृख मांग समाजात झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या आईचे नाव वालुबाई साठे होते. जातीव्यवस्था, गरीबी आणि भेदभावामुळे अण्णाभाऊंना शिक्षण घेता आले नाही. अण्णाभाऊ साठे यांनी केवळ दीड दिवसातच शाळा सोडली त्यांना पुढे जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

छोटेखानी मराठी भाषण निबंध

वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो! सर्वप्रथम सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप शुभेच्छा..! आज मी आपल्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.

अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक, लेखक व कादंबरीकार होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे हे होते. त्यांचा जन्म 01 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव वालुबाई आणि वडिलांचे नाव भाऊराव हे होते. त्यांनी अनेक उत्कृष्ट कादंबऱ्या व कथांचे लेखन केले. त्यांना आपण पोवाडे व लावणी रचणारा ‘शाहीर’ म्हणूनही ओळखतो. त्यांनी लेखन केलेल्या कादंबरीवर अनेक चित्रपट देखील तयार करण्यात आले. ‘फकीरा‘ ही त्यांची खूप गाजलेली कादंबरी आहे.

छोटे भाषण

वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो! सर्वप्रथम सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप शुभेच्छा..! लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 01 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते. जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. पण ते खचले नाहीत. नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते. शाळा न शिकताही त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली. त्यांनी कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे, पटकथा, लावणी यांची निर्मिती केली. त्यांची ‘मुंबईची लावणी’ व ‘माझी मैना गावावर राहिली’ या लावण्या अविस्मरणीय आहेत. रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते. ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव’ हे आंबेडकरांवरील गीत खूप गाजले. ‘फकीरा’ या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com