Nag Panchami 2022
Nag Panchami 2022Team Lokshahi

Nag Panchami 2022 : नागपंचमी का साजरी केली जाते? जाणून घ्या या सणाशी संबंधित या महत्त्वाच्या गोष्टी

पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी.

पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. महाराष्ट्रासह संपुर्ण देशात नागपंचमी हा सण साजरा केला जातो. या दिवशी शिवभक्त नागदेवतेची विशेष पूजा करतात. मंदिरांमध्ये नागदेवतेचा जलाभिषेक करून त्याला दूध अर्पण केले जाते. शिवभक्तही या दिवशी उपवास करतात. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात, अशी मान्यता आहे. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून नागपंचमीशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

नागपंचमीचे महत्त्व

हिंदू सणांमध्ये नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नाग हा शिवाच्या गळ्यातील अलंकार आहे. नागपंचमीला जीवनात सुख-समृद्धी, शेतातील पिकांचे संरक्षण यासाठी नागदेवतेची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी भगवान भोलेनाथाची पूजा करून नागदेवतेला रुद्राभिषेक केल्याने जीवनातील कालसर्प दोष समाप्त होतो. या दिवशी नागांना अभिषेक करून त्यांना दूध अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते. शास्त्रानुसार नागपंचमीला घराबाहेर नागाचे चित्र लावल्यास नागदेवतेची कृपा कुटुंबावर कायम राहते.

नागपुजेचे असेही महत्व

विषारी साप किंवा बिनविषारी साप आपणहून कोणालाच उपद्रव निर्माण करत नहीच पण मानवी उपद्रव ठरणाऱ्या उंदिर घुशीचा फडशा पाडतो. ही नैसर्गिक वास्तविकता मानवी मनावर ठासावी, या उद्देशाने नागपंचमी करतात सण साजरा केला जातो.

Nag Panchami 2022
Mangla gauri vrat 2022 : मंगळागौर का ठेवतात आणि मंगळागौरीची पूजा विधी
Lokshahi
www.lokshahi.com