पितृपक्ष पंधरवडा आजपासून सुरू; जाणून घ्या श्राद्ध पद्धत, विधी, महत्व

पितृपक्ष पंधरवडा आजपासून सुरू; जाणून घ्या श्राद्ध पद्धत, विधी, महत्व

पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय. पितृपक्षाचा महिना सुरू झाला आहे. हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्त्व आहे. आपल्या नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल, त्या तिथीला श्राद्ध केले जाते. या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते.
Published by :
Siddhi Naringrekar

पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय. पितृपक्षाचा महिना सुरू झाला आहे. हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्त्व आहे. आपल्या नातेवाईकाचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल, त्या तिथीला श्राद्ध केले जाते. या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. या पक्षात यमलोकातून पितर म्हणजेचे आपले मृत पूर्वज आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात, अशी समजूत आहे. पितृ पंधरवडा पितृकार्यासाठी योग्य समजला जातो.

पितृपक्षात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते. श्राद्धाच्या दिवशी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती स्नान करून कुश गवताची अंगठी घालून नवीन वस्त्रे परिधान करतात. पूर्वजांचे छायाचित्र ठेवलेले जाते.या विधीत काळे तीळ आणि जवसच्या बियांचा उपयोग केला जातो. पिंड पूर्वजांना तांदूळ किंवा गव्हाच्या गोळ्यांच्या रूपात अर्पण केले जातात.पिंड हे मध, तांदूळ, गहू, बकरीचे दूध, साखर आणि तूप यापासून बनवले जाते. यानंतर जल, मैदा, जवस, कुश आणि काळे तीळ मिश्रित तर्पण अर्पण केले जाते.

यंदा पितृपक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. तर, रविवारी, 25 सप्टेंबरला पितृपक्षाची समाप्ती होईल. पितृपक्ष हा 15 दिवसांचा कालावधी आहे, जो हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी सुरू होतो. या दरम्यान पिंड दान केले जाते. पितृपक्षात श्राद्धासाठी तयार करण्यात आलेल्या पाच विशेष प्रकारच्या जीवांना भोजन देण्याचा नियम आहे. यासाठी सर्व प्रथम ब्राह्मणांसाठी शिजवलेले अन्न पाच भागांमध्ये काढून सर्वांचे वेगवेगळे मंत्र जपत, प्रत्येक भागावर अखंड ठेवून पंचबली अर्पण केली जाते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com