RAHUL GANDHI ON MODI AND ADANI
RAHUL GANDHI ON MODI AND ADANITEAM LOKSHAHI

अदानींवर हल्ला, मोदींवर निशाणा...लोकसभेत राहुल गांधी आक्रमक पवित्र्यात!

हिंडेनबर्गचा अहवाल (Hindenburg research Report) आला ; आणि अदानी समुहाच्या शेअर्सची मोठी पडझड झाली. हे प्रकरण ताज असतानाचं, काँग्रेस नेते राहुल गांधींनी या विषयावर लोकसभेत आज भाष्य केलं आहे. राहुल गांधी भलत्याचं आक्रमक पवित्र्यात पाहायला मिळाले.
Published by :
Team Lokshahi

रोहित शिंदे | मुंबई: हिंडेनबर्गचा अहवाल (Hindenburg research Report) आला आणि अदानी समूहाचे (Adani Group) शेअर्स आपटले. समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. अदानी समूहासाठी हा अहवाल अतिशय नकारात्मक होता. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूह 'सामाजिक फेरफार आणि अकाउंटिंग फ्रॉड'मध्ये (Stock manipulation and accounting fraud) गुंतल्याचे गंभीर आरोप केले. हिंडेनबर्ग संशोधन अहवालात अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले, मात्र, नंतर अदानी समूहाने सर्व आरोप फेटाळून लावले.

पडझडीतुन सावरण्याचा अदानी समुहाचा प्रयत्न: दरम्यान, आता मोठ्या आर्थिक संकटातून अदानी समुह सावरण्याच्या प्रयत्नात आहे. अदानी समूह आपल्या समूहाचे तारण समभाग म्हणजेच शेअर्स सोडवण्यासाठी 1114 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 9 हजार कोटींचे प्री पेमेंट करणार आहे. हे शेअर्स अदानी पोर्टस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशनचे आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधींचा हल्लाबोल: दरम्यान, भारत जोडोच्या माध्यमातुन सकारात्मक ऊर्जा घेवून काँग्रेस नेते राहुल गांधी नुकतेच लोकसभेत परतले आहेत. लोकसभेत राहुल गांधींनी (Rahul Gandhi on Adani Group) अदानी समुहाला धारेवर धरलं. गौतम अदानी, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधी चांगलेचं बरसले. हिंडेनबर्गच्या अहवालाचा दाखला देत, 2014 ते 2023 या काळात श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी 904 वरून थेट दुसऱ्या क्रमांकावर अदानी कसे आले? त्यांना कोण बळ देतं? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.

गौतम अदानी आणि पंतप्रधानांचा संबंध काय? ज्या अदानींमुळे गुंतवणुकदारांचं कोट्यवधींचं नुकसान झालं; ते गौतम अदानी आणि पंतप्रधानांचा संबंध काय? असा सवाल उपस्थित करत त्यांनी अदानींवर हल्ला करतानाचं मोदींवर निशाणा (Rahul Gandhi criticizes Modi) साधला. देशात सर्वत्र अदानींच स्तोम माजल्याचं राहुल गांधी म्हणाले. आता या प्रकरणात मोदी सरकारच्या बाजूने काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राहुल गांधी आक्रमक: भारत जोडो यात्रेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर राहूल गांधी आक्रमक पवित्र्यात पाहायला मिळत आहेत. महागाई, बेरोजगारी, अग्निवीरच्या मुद्द्यावर राहुल गांधी संसदेत केंद्र सरकारवर बरसले. राहुल गांधींच्या आक्रमक (Rahul Gandhis aggression) बाण्यामुळे काँग्रेस जनांत उत्साह संचारला आहे, एवढं मात्र नक्की.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com