Raj Thackeray
Raj Thackeray Team Lokshahi

खरी 'लोकशाही' लोकांना जाणवू देतील; राज ठाकरेंच्या वर्धापन दिनानिमित्त खास शुभेच्छा

लोकशाहीला आज गौरवपूर्ण 3 वर्ष पूर्ण; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कार्यालयाला सदिच्छा भेट

26 जानेवारी 2020 हा दिवस अनेकांगांनी महत्त्वाचा आहे. याच दिवशी संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना लोकशाही न्यूजला सुरुवात झाली. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून एका मोठ्या प्रवासाला सुरुवात केली. आणि प्रेक्षकांनी, हितचिंतकांनीदेखील लोकशाही न्यूजला भरपूर प्रेम, साथ दिली. याच प्रेमाच्या, विश्वासाच्या आधारावर आज 3 वर्षांची गौरवपूर्ण वाटचाल सुरु असून चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः उपस्थित राहत लोकशाहीला शुभेच्छा दिल्या.

Raj Thackeray
प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने बनवले खास डूडल

राज ठाकरे यांनी लोकशाही चॅनेलमध्ये हजेरी लावत खास शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, लोकशाही चॅनेलला वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. गणेश नायडूंच्या रुपाने लोकशाहीला अत्यंत उत्साही मालक मिळाला आहे. खरी लोकशाही कशाला म्हणातात हे लोकांना जाणवू देतील. हे उत्तम चॅनेल पुढे चालू राहो. आणि लोकशाहीचा टीआरपी लवकरात लवकर 1 नंबरला येवो, अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली आहे. सोबतच, राज ठाकरे यांनी लोकशाही चॅनेलच्या कार्यालयाच्या विविध विभागांना भेट दिली आहे. व लोकशाहीच्या कामाची स्तुती केली आहे. तसेच, राज ठाकरेंनी त्यांची स्वाक्षरी देखील केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com