स्वातंत्र्यसैनिक राजगुरु यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी

स्वातंत्र्यसैनिक राजगुरु यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या कधीही न ऐकलेल्या गोष्टी

राजगुरु यांच्या नावाच्या व्यतिरिक्त अनेकांना त्यांचे कर्तृत्व व वैयक्तिक माहितीच नाही. मात्र आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्याबद्दल न ऐकलेल्या गोष्टीबद्दल सांगणार आहोत.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Rajguru Birth Anniversary : क्रांतिकारक म्हटलं कि सुरुवातीच्या काही नावात येणार नाव म्हणजे शिवराम हरी राजगुरू. लहानपणापासून क्रांतिकारी विचारांनी प्रभावित असलेले राजगुरू संस्कृत शिकण्यासाठी वाराणसी येथे गेले. येथेच चंद्रशेखर आझाद यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव राजगुरूंवर पडला. आणि क्रांतिकारकांच्या सहवासात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले होते. राजगुरु यांच्या नावाच्या व्यतिरिक्त अनेकांना त्यांचे कर्तृत्व व वैयक्तिक माहितीच नाही. मात्र आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्याबद्दल न ऐकलेल्या गोष्टीबद्दल सांगणार आहोत.

राजगुरु यांच्याविषयी न ऐकलेल्या गोष्टी

- भगतसिंग आणि सुखदेव यांच्यात सामील होउन आणि लाला लाजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 1828 मध्ये लाहोर येथे ब्रिटिश पोलिस अधिकारी जे पी सॉन्डर्सच्या हत्येमध्ये भाग घेतला.

- लाला लजपतराय यांच्यावर लाठीमार करणारा उपपोलीस अधीक्षक सॅन्डर्स लाहोरामधील आपल्या कार्यालयाच्या बाहेर निघाला असता राजगुरूने त्यांच्यावर गोळी झाडली.

- राजगुरू 30 डिसेंबर, 1929 मध्ये पुण्यात पकडले गेले.

- लाहोर कटातील सहभागाबद्दल पुष्कळ क्रांतिकारकांवर खटला चालला.

- नॅशनल बँकेची लूट, क्रांतिकारक जोगेश चंद्रा चॅटर्जी यांची सुटका यांतही राजगुरूंचा सहभाग होता

- भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांनी लाहोर तुरुंगात 23 मार्च, 1931 रोजी फासावर चढून वीरमरण पत्करले.

- ब्रिटिश राजवटीविरूद्ध लढताना जहाल विचारसरणी अधिक प्रभावी होती असा त्यांचा विश्वास होता. त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com