Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन दिनी तुमच्या बहिण-भावांना पाठवा 'हे' मेसेज; तुमचे नाते होईल दृढ

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन दिनी तुमच्या बहिण-भावांना पाठवा 'हे' मेसेज; तुमचे नाते होईल दृढ

एकमेकांना शुभेच्छा दिल्याशिवाय कोणताही सण अपूर्ण वाटतो. रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Raksha Bandhan 2023 : एकमेकांना शुभेच्छा दिल्याशिवाय कोणताही सण अपूर्ण वाटतो. रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे. 30 आणि 31 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. जर तुम्ही या दिवशी तुमच्या भावंडांपर्यंत पोहोचू शकत नसाल तर तुम्ही या सुंदर संदेशांद्वारे तुमच्या भावंडांना शुभेच्छा देऊ शकता. तुम्ही त्यांना व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस किंवा फेसबुकवरही शेअर करू शकता.

चंद्राला चंदन देवाला वंदन भाऊ

बहीनीचं प्रेम म्हणजे.. रक्षाबंधन

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन

घेऊन आला हा श्रावण

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहिण भावाचा पवित्र सण

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

थोडी लढणारी, भांडणारी, चिडणारी

थोडी काळजी घेणारी मस्ती करणारी

एक बहीण असते तीच तर राखी

पौर्णिमेची खरी शान असते

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

भाऊ-बहिणीचे अतूट नाते

रेशमी धाग्यांनी विणणारा सण

रक्ता-नात्याची असो वा मानलेली

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

भांडण, राग, दोस्ती..

प्रेम, काळजी, मस्ती…

म्हणजे भाऊ बहीण!

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com