Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशीच पतंग का उडवले जातात?

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशीच पतंग का उडवले जातात?

यावर्षी मकर संक्रांती १५ जानेवारी २०२४ रोजी देशभरात साजरा करणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी देशभरात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे.
Published by :
Team Lokshahi

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांती यंदा १५ जानेवारी २०२४ रोजी देशभरात साजरा करणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी विविध परंपरा पाहायला मिळतात. देशभरात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे. परंतु, मकर संक्रांतीच्या दिवशीच पतंग का उडवले जातात? यामागचे कारण तुम्हाला माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया...

पतंग उडवण्यामागे धार्मिक कारण

मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. धार्मिक मान्यतेनुसार प्रभू श्रीरामांनी पतंगबाजीची परंपरा सुरू केली होती. प्रभू श्रीराम यांनी उडवलेला पतंग इंद्रलोकात पोहोचला होता, अशी मान्यता आहे. तेव्हापासून आजपर्यंत पतंग उडवण्याची परंपरा आहे, जे वर्षानुवर्ष सुरू आहे.

पतंग उडवण्यामागे वैज्ञानिक कारण

जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची किरणे शरीरासाठी अमृतसमान असतात. तसेच, तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होते. इतकंच नाही तर, यामुळे विविध प्रकारच्या आजारांपासूनदेखील संरक्षण मिळते. यामुळे आवर्जुन मकर संक्रातीच्या दिवशी पतंग उडवले जातात.

भारतात पतंग उडवण्याला सुख, स्वातंत्र्य, आणि शुभ कामाचे लक्षण म्हणूनही मानले जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून एकमेकांना आनंदाचा संदेश देखील दिलं जातं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com