Somvati Amavasya 2023: सोमवती अमावस्येची पूजा, विधी जाणून घ्या

Somvati Amavasya 2023: सोमवती अमावस्येची पूजा, विधी जाणून घ्या

कृष्ण पक्षात रविवारी, 16 जुलै रोजी रात्री 10:08 वाजता अमावस्या तिथी सुरू झाली.
Published by  :
Siddhi Naringrekar

कृष्ण पक्षात रविवारी, 16 जुलै रोजी रात्री 10:08 वाजता अमावस्या तिथी सुरू होईल. तर 17 जुलै रोजी दुपारी 12:01 पर्यंत असेल. यावर्षी सोमवती अमावस्या श्रावण अमावस्या तिथीला येत आहे. सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावस्या असे म्हंटले जाते.

अमावस्येच्या दिवशी माता पार्वती आणि भोलेनाथ यांची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते. ही अमावस्या आषाढाचा शेवट आणि श्रावणाची सुरुवात करणारी असणार आहे. सोमवारी आलेली अमावस्या म्हणून या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं गेलं आहे.

सोमवती अमावस्येला भगवान भोले शंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. या दिवशी शिव गौरीची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते. सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत ठेवून पिंपळाच्या झाडाची पूजा दूध, पाणी, फुले, अक्षत, चंदन इत्यादींनी करतात आणि कच्च्या सुती धाग्याला गुंडाळून झाडाला 108 वेळा प्रदक्षिणा घालतात. तसेच या दिवशी मौन पाळण्याची परंपरा आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी पूजा-पाठ, दान आणि अर्पण केल्यास विशेष फळ मिळते. या दिवशी भगवान भोलेनाथाची विधिवत पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी राहते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com