Independence Day: स्वातंत्र्यदिनानिमित्त द्या 'या' खास शुभेच्छा!
उद्या संपूर्ण देश 'स्वातंत्र्य दिन' (Independence Day) साजरा करणार आहे. 1947 पासून दरवर्षी भारतात 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यांची ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रत्येक भारतीय अभिमानाने स्वातंत्र्य दिन साजरा करतो. स्वातंत्र्य दिनाच्या खास प्रसंगी प्रत्येक जण आपल्या मित्र परिवार, नातेवाईक आणि कुटुंबीयांना शुभेच्छा संदेश (Independence Day Wishes) पाठवतात. यावर्षी तुम्हीसुद्धा तुमच्या मित्र परिवार आणि नातेवाईकांना मराठीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा पाठवू शकता....

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा आणि हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने तरी
फडकतात नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

देशाचे स्वातंत्र्य मानाने मिरवू,
प्रत्येक घरावर तिरंगा फडकवू,
भारतमातेचे गीत गाऊ,
तिरंगा लावू घरोघरी...
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

धर्म तिरंगा कर्म तिरंगा,
चराचरात तिरंगा,
घराघरात तिरंगा सत्य तिरंगा,
नित्य तिरंगा हर घर तिरंगा,
हर मन तिरंगा,
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!