दरवर्षी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन का साजरा केला जातो?

दरवर्षी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन का साजरा केला जातो?

महिला दिना' प्रमाणेच, 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन' दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. समाज आणि कुटुंबातील पुरुषांचे महत्त्व आणि योगदान साजरा करण्यासाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून साजरा केला जातो.
Published by  :
Team Lokshahi

'महिला दिना' प्रमाणेच, 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन' दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. समाज आणि कुटुंबातील पुरुषांचे महत्त्व आणि योगदान साजरा करण्यासाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनामुळे समाजातील पुरुषांची सकारात्मक प्रतिमा प्रतिबिंबित होत असते. हा दिवस समाज, समुदाय, कुटुंब, विवाह, मुलांची काळजी आणि समाजातील पुरुषांचे योगदान साजरे करण्यावर भर देतो. या दिवशी समाजात पुरुषांविरुद्ध होत असलेल्या भेदभावावरही प्रकाश टाकला जातो. पुरुष दिनामुळे लैंगिक समानतेला प्रोत्साहन मिळण्यास मदत होते.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास

1999 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील वेस्ट इंडीज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम तेलकसिंग यांनी त्यांच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन पहिल्यांदा साजरा केला. या दिवशी त्यांनी पुरुषांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले. 19 नोव्हेंबर 2007 रोजी भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचे महत्त्व

आंतरराष्‍ट्रीय पुरूष दिन साजरा करण्‍याचा मुख्‍य उद्देश हा आहे की, पुरूषांचे संघर्ष आणि ते वर्षानुवर्षे सामोरे जात असलेल्या सामाजिक परिस्थितीची माहिती समाजाला होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी, पुरुषांवरील भेदभावाबद्दल देखील बोलले जाते आणि चांगले लैंगिक संबंध निर्माण करण्याचे आश्वासन दिले जाते. पुरुषांचीही समाजात आणि कुटुंबात वेगळी ओळख असते. त्यांच्या योगदानाचे कौतुक करणे महत्त्वाचे आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com