Shravan Somvar
Shravan SomvarTeam Lokshahi

Shravan Somvar : Special Story : जितक्या वेळा पाडले गेले तितक्या वेळा उठून उभे राहिले सोमनाथ मंदिर, जाणून घ्या इतिहास

गुजराच्या सौराष्ट्रात वेरावळनजीक सोमनाथ हे श्रीशंकराचे मंदिर आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ अग्रस्थानी आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या स्तंभाचे टोक ज्या दिशेने आहे त्या दिशेस दक्षिणेकडील अंटार्टिकापर्यंत जमिनीचा एकही तुकडा नाही.
Published by :
Team Lokshahi

गुजराच्या सौराष्ट्रात वेरावळनजीक सोमनाथ हे श्रीशंकराचे मंदिर आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ अग्रस्थानी आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या स्तंभाचे टोक ज्या दिशेने आहे त्या दिशेस दक्षिणेकडील अंटार्टिकापर्यंत जमिनीचा एकही तुकडा नाही. इतिहासकारांच्या मते, सोमनाथ मंदिराला 17 वेळा नष्ट करण्यात आलं आहे आणि प्रत्येकवेळी या मंदिराची पुनर्रचना करण्यात आली आहे. प्राचीन भारतीय इतिहास आणि आधुनिक भारताच्या इतिहासात सोमनाथ मंदिराला 1024 मध्ये महमूद गजनवीने पूर्णपणे नष्ट केलं होतं. मूर्ती तोडण्यापासून ते मंदिरावर चढवण्यात आलेल्या सोने-चांदीच्या सर्व दागिन्यांना लूटून नेलं होतं .

स्वतंत्र भारताच्या एका परियोजनेत सोमनाथ मंदिराचा पुनर्निर्माण करण्यात आला. सध्याच्या मंदिराचं पुनर्निर्माण स्वातंत्र्यानंतर लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेलने 1951 मध्ये केलं होतं. 1 डिसेंबर 1995 ला भारताचे राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी या मंदिराला देशाला समर्पित केलं होतं. जुनागड रियासतला भारतचा भाग बनवल्यानंतर भारताचे माजी गृहमंत्री सरदार पटेल यांनी जुलै 1947 मध्ये सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचे आदेश दिले.

सोमनाथमध्ये दूसरं शिव मंदिर वल्लभीचे यादव राजांनी ईसवी सन 649 मध्ये बनवलं होतं. याला ईसवी सन 725 मध्ये सिंधचे गव्हर्नर अल-जुनैद द्वारे नष्ट करण्यात आलं होतं (History Of Somnath Temple).

त्यानंतर गुर्जर प्रतिहार वंशचे राजा नागभट्ट द्वितीय द्वारा ईसवी सन 815 मध्ये तिसऱ्यांदा शिव मंदिराची रचना करण्यात आली. या मंदिरची रचना लाल बलुआ दगडांनी करण्यात आली आहे. नागभट्टद्वारे सौराष्ट्रमध्ये सोमनाथ मंदिराच्या दर्शनाचे ऐतिहासिक पुरावे आढळून येतात.

त्यानंतर चालुक्य राजा मुलराजने ईसवी सन 997 मध्ये या मंदिराचं नूतनीकरण केलं. ईसवीसन 1024 मध्ये सोमनाथ मंदिराला तुर्क शासक महमूद गजनवीने तोडलं.

महमूदने मंदिरातून जवळपास 20 मिलिअन दिनार लूटून ज्योतिर्लिंगला तोडण्यात आलं होतं. त्यासोबतच जवळपास 50,000 हजार लोकांची मंदिराची रक्षा करताना हत्या केली होती.

Shravan Somvar
Shravan 2022 : श्रावणमध्ये या 5 राशींवर असेल भगवान शिवाची कृपा, कोणाचे नशीब बदलेल

महमूदच्या हल्ल्यानंतर राजा कुमारपालने ईसवीसन 1169 मध्ये उत्कृष्ट दगडातून या मंदिराची पुनर्रचना केली. पण, अलाउद्दीन खिलजीने गुजरात विजयदरम्यान ईसवी 1299 मध्ये नष्ट केलं. सोमनाथ मंदिराला शेवटच्या वेळी ईसवी सन 1665 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबने अशा पद्धतीने नष्ट केलं होतं की याची पुनर्रचना केलीच जाऊ नये. नंतर सोमनाथ मंदिराच्या स्थानावर 1706 मध्ये एक मशीद बनवण्यात आली. 1950 मध्ये मंदिराच्या पुनर्रचनेदरम्यान या मशीदीला येथून हटवण्यात आलं.

गांधींच्या सांगण्यावरुन जनतेकडून पैसा गोळा केला

सोमनाथ मंदिराला पुन्हा बनवण्याचा प्रस्ताव घेऊन सरदार पटेल महात्मा गांधींकडे गेले. गांधीजींनी या प्रस्तावाचं कौतुक केलं आमि जनतेकडून यासाठी पैसे गोळा करण्याचा सल्ला दिला. सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतर मंदिर पुनर्निर्माणाचं काम हे एम मुंशी यांच्या देखरेखीत पूर्ण झालं. मुंशी हे त्यावेळी भारत सरकारचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते.

सोमनाथ मंदिरचा पुनर्रचना ही स्वतंत्र भारताची सर्वात प्रतिष्ठित आणि सम्मानित प्रकल्प मानला जातो. याला सोमनाथ महा मेरु प्रसाद यांच्या नावानेही ओळखलं जातं. या मंदिराच्या कामाला पारंपरिक भारतीय नगर शैलीच्या मंदिरांचे डिझाइन बनवण्यात निपुण सोमपुरा परिवार यांनी पुर्नत्वास नेलं.

प्रभाशंकर सोमपुरा सोमनाथ मंदिराचे आर्किटेक्ट

सोमनाथ मंदिराचे आर्किटेक्ट हे पद्मश्री प्रभाशंकर सोमपुरा होते. अयोध्या राम मंदिर मॉडेलची रचनाही यांचे नातू चंद्रकांत भाई सोमपुरा यांनी केला होता.

वर्तमानात सोमनाथ मंदिराची रचना गुजरातच्या चालुक्य वास्तूकला शैलीमध्ये 1951 मध्ये करण्यात आला. चालुक्य वास्तूकला शैली उत्तर भारताच्या मंदिर निर्माण नगर शैलीचा एक प्रकार आहे. प्राचीन ऐतिहासिक फलकांनुसार, सोमनाथमध्ये पहिले शिव मंदिराच्या स्थानाबाबत माहिती उपलब्ध नाही.

१७ वेळा नष्ट झाले सोमनाथ मंदिर

इतिहासकार म्हणतात की सोमनाथ मंदिर 17 वेळा नष्ट झाले आणि प्रत्येक वेळी पुन्हा बांधले गेले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी सध्याच्या इमारतीच्या पुनर्बांधणीला सुरुवात केली आणि 01 डिसेंबर 1955 रोजी भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ते राष्ट्राला समर्पित केले.

पाच वर्षात बांधले गेले...

सोमनाथ मंदिराची सध्याची रचना 5 वर्षांत बांधली गेली आणि 1951 मध्ये पूर्ण झाली. मुख्य मंदिराच्या संरचनेत ज्योतिर्लिंग, सभा मंडपम आणि नृत्य मंडपम असलेल्या गर्भगृहाचा समावेश आहे. मुख्य शिखर किंवा बुरुज 150 फूट उंचीपर्यंत आहे. शिखराच्या शिखरावर सुमारे 10 टन वजनाचा कलश आणि 27 फूट उंचीचा आणि 1 फूट परिघाचा ध्वजदंड (ध्वज) आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com