बहिण - भावाच्या नात्याचा गोड दिवस म्हणजेच 'रक्षाबंधन'

बहिण - भावाच्या नात्याचा गोड दिवस म्हणजेच 'रक्षाबंधन'

रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. श्रावण महिन्यात साजऱ्या होणाऱ्या या सणाची बंधू-भगिनी आतुरतेने वाट पाहतात. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.
Published by  :
Team Lokshahi

रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. श्रावण महिन्यात साजऱ्या होणाऱ्या या सणाची बंधू-भगिनी आतुरतेने वाट पाहतात. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. दरवर्षी श्रावण पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा सण 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान येतो, परंतु यावर्षी श्रावण महिन्यात अधिक महिना होता. या कारणास्तव, श्रावण एक ऐवजी दोन महिन्यांचा होता. श्रावण 18 जुलैपासून सुरू होईल आणि 15 सप्टेंबरला संपेल. अशा प्रकारे रक्षाबंधन नेहमीपेक्षा सुमारे 15 दिवस उशिराने साजरा केला जाईल. एवढेच नाही तर रक्षाबंधन एका ऐवजी दोन दिवस साजरे केले जाणार आहे. एवढेच नाही तर रक्षाबंधनाच्या दिवशीही भद्र येणार आहे. रक्षाबंधन दोन्ही दिवशी साजरे करता येईल. पण 30 ऑगस्टच्या सकाळी 10.58 वाजता भद्रा सुरू होईल आणि 30 ऑगस्टच्या रात्री 9.15 वाजता संपेल. त्यामुळे 30 ऑगस्ट रोजी रात्री 9:01 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7:05 पर्यंत बहिणी आपल्या भावांना राखी बांधू शकतील.

भद्रकालात राखी का बांधली जात नाही?

धार्मिक शास्त्रांमध्ये भद्रकाल हे शुभ कार्य करण्यासाठी अशुभ मानले गेले आहे. भाद्र काळात केलेले शुभ कार्यही अशुभ फळ देते. विशेषत: भद्रामध्ये राखी बांधण्यास सक्त मनाई आहे. खरे तर भाद्र काळात रावणाच्या बहिणीने त्याला राखी बांधली होती आणि त्याच वर्षी भगवान रामाने लंकापती रावणाचा वध केला होता. एवढेच नाही तर रावणाच्या संपूर्ण वंशाचा नायनाट केला. त्यामुळे भद्रमध्ये राखी बांधल्याने भावाचे आयुष्य कमी होते अशी धार्मिक मान्यता आहे.

रक्षाबंधन दिवस कशाप्रकारे साजरा केला जातो?

रक्षाबंधन बद्दल खूप पारंपारिक, पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टी आहेत. महाभारतामध्ये द्रोपदी (पांडवांची पत्नी) ने आपल्या साडीचा पदर फाडून “भगवान श्रीकृष्ण” यांच्या बोटाला बांधला होता. ज्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या बोटांमधून रक्त येण्याचे थांबले होते. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यामध्ये भावा-बहिणीचे नाते निर्माण झाले आणि श्री कृष्णाने द्रौपदीला असे वचन दिले की जेव्हा ती संकटामध्ये सापडेल तेव्हा ते तिच्या रक्षणासाठी धावून येतील.

रक्षाबंधन भारतातील सर्वात मोठा सण का आहे?

आपल्या भारत देशा प्रमाणेच आपल्या भारतातील संस्कृती आणि त्यामध्ये केले जाणारे सण हे सुद्धा खूप मोठे आहे कारण की आपल्या भारतीयांचे हृदयच खूप मोठे आहे त्यामुळे आपण सगळे सण साजरे करतो. (उदाहरणार्थ आपला भारत हा विविधतेने नटलेला आहे तसेच आपल्या भारत देशामध्ये हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन या सारखे लोक एकत्र मिळून हातात) आणि आपण भारतीय हे सर्व सण एकत्र मिळून साजरे करतो. जगामध्ये असा कुठलाही देश नाही भारतासारखी संस्कृती आणि विविधता आपल्यामध्ये सामावून घेतो. आपल्या भारत देशामध्ये हिंदू-मुस्लीम आणि ख्रिश्चन हे एकमेकांचे सण साजरे करताना दिसतात. जसे की “बकरी ईद” या दिवशी मुसलमान भाई आपल्या हिंदू मित्रांना आपल्या घरी जेवायला बोलावतात तसेच हिंदू लोक दिवाळीच्या दिवशी आपल्या घरात बनवलेले “दिवाळीचे फराळ” मुसलमान भाईंना देतात. आपण नाताळ म्हणजे क्रिसमस सुद्धा साजरा करतो आणि ही विविधता फक्त आपल्या भारत देशात आढळून येते इतर कुठल्याही देशांमध्ये अशा प्रकारचे वातावरण तुम्हाला पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आपली भारतीय संस्कृती किती महान आहे याचे दाखले आता पाश्चिमात्य संस्कृती सुद्धा घेत आहे. होळीसारख्या सणाच्या दिवशी बाहेरून विदेशी म्हणजेच फॉरेनर भारत देशामध्ये होळी खेळण्यासाठी येतात. रक्षाबंधन हा दिवस कोणताही धर्म, जात, पात पाहत नाही हा एक “भावा बहिणीचा दिवस आहे.” आणि हा दिवस हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन, बौद्ध यासारख्या धर्माचे लोकसुद्धा साजरे करतात तसेच आता रक्षाबंधन हा सण पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा साजरा केला जात आहे. त्यामुळे भारतामध्ये साजरा होणारा रक्षाबंधन सर्वात मोठा सण आहे कारण की यामध्ये कोणत्याही प्रकारची जात-पात केली जात नाही.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com