आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या शुभ मुहूर्त

आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या शुभ मुहूर्त

अंगारकी संकष्टी चतुर्थी 13 सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे.

अंगारकी संकष्टी चतुर्थी 13 सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी करतात. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी 7.37 पर्यंत वृद्धी योग राहील आणि त्यानंतर अतिशय शुभ ध्रुव योग होईल. या दिवशी सकाळी 06:36 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:05 पर्यंत सर्वार्थसिद्धी योग असेल. यादरम्यान अमृत योगही राहणार आहे.

संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत:

अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे. या दिवशी चंद्रोदयापूर्वी गणेशाची पूजा करावी लागते. एका चौरंगावर लाल किंवा पिवळे कापड टाकून त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. गणेशाला अक्षता, धूप, दिवा, कापूर, लवंग आणि दुर्वा अर्पण करा. यानंतर गणपतीची आरती करा.

अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10.37 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजे, बुधवार, 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10.23 वाजता समाप्त होईल.

Lokshahi
www.lokshahi.com