आज शिख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांची जयंती; जाणून घ्या इतिहास

आज शिख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांची जयंती; जाणून घ्या इतिहास

गुरु नानक जयंती हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा हा सण 8 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

गुरु नानक जयंती हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा हा सण 8 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात आहे. शीख धर्माच्या अनुयायांसाठी ही जयंती खूप खास आहे. या कारणास्तव याला 'गुरु परब' किंवा 'प्रकाश पर्व'असेही म्हणतात. कारण याच दिवशी गुरु नानक देव यांचा जन्म झाला होता. 1469 साली कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यामुळेच या दिवशी देश-विदेशाच्या कानाकोपऱ्यात कीर्तनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

गुरु नानक जयंतीचा इतिहास आणि तारीख जाणून घ्या. गुरु नानक जी नैतिकता, कठीण परिश्रम आणि सत्यतेचा संदेश देतात. हा दिवस मोठ्या श्रद्धेने आणि सामूहिक भावनेने आणि प्रयत्नाने, जगभरात उत्साहाने साजरा केला जातो. गुरु नानक यांचे जीवन प्रेम, सत्य आणि शौर्याने भरलेले होते. या दिवशी वाहे वाहे गुरुचा जयघोष करत प्रभातफेरी काढली जाते. सायंकाळी लंगरचे आयोजन केले जाते. गुरुद्वारांमध्ये शब्द-कीर्तने खेळली जातात आणि गुणवाणीचे पठण केले जाते. हा दिवस हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला साजरा केला जातो. यासोबतच लोक फोनद्वारे एकमेकांना गुरुपर्वच्या शुभेच्छाही देतात. गुरु नानक जी शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होते.

गुरु नानक जयंतीचा इतिहास

शीख धर्माचे पहिले गुरु, गुरू नानक देवजी यांचा जन्म 1469 मध्ये झाला. गुरु नानक देव यांचा जन्म भोई की तलवंडी येथे झाला, ज्यांना राय भोई दी तलवंडी असेही म्हणतात.

आता या जागेला नानक देव यांचे नाव देण्यात आले. येथे देश-विदेशातील लोक प्रसिद्ध गुरुद्वारा ननकाना साहिबला भेट देण्यासाठी येतात आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. हा गुरुद्वारा 'ननकाना साहिब' शेर-ए पंजाब म्हणून ओळखल्या जाणार्याी शीख साम्राज्याचे राजा महाराजा रणजीत सिंह यांनी बांधला होता

गुरू नानकजींनी शीख समाजाची पायाभरणी केली होती असे म्हणतात. गुरु नानक देव हे शीख समाजाचे पहिले गुरु आणि या धर्माचे संस्थापक देखील आहेत. त्यांना नानक देव, बाबा नानक आणि नानक शाह या नावानेही ओळखले जाते. एवढेच नाही तर लडाख आणि तिबेट प्रदेशात त्यांना नानक लामा असेही म्हणतात. भारताव्यतिरिक्त गुरू नानक देव यांनी अफगाणिस्तान, इराण आणि अरब देशांमध्येही प्रचार केला.

गुरू नानक साहेब यांचे 22 सप्टेंबर 1539 रोजी निधन झालं. सध्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या कर्तारपूर या ठिकाणी त्यांचे निधन झाले. हे ठिकाण शिख समुदायासाठी अत्यंत पवित्र असून ते आता डेरा बाबा नानक या नावाने ओळखलं जातं. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com