आज जागतिक कर्करोग दिन; इतिहास आणि त्याचं महत्व जाणून घ्या...

आज जागतिक कर्करोग दिन; इतिहास आणि त्याचं महत्व जाणून घ्या...

दरवर्षी ४ फेब्रुवारी जगभरात जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो.
Published by :
Siddhi Naringrekar

दरवर्षी ४ फेब्रुवारी जगभरात जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. हा खास दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना कॅन्सरबद्दल जागरूक करणे हा आहे.विविध प्रकारच्या कर्करोगामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. तोंडाचा कर्करोग हा देखील असाच एक झपाट्याने वाढणारा धोका आहे. भारतात सर्वाधिक वेगाने वाढणारा आजार म्हणजेच 'कॅन्सर'. मात्र, आजही कॅन्सरबद्दल लोकांमध्ये जागृकता नसल्याचं दिसून येतं. कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. प्राणघातक आणि धोकादायक आजाराबद्दल लोकांमध्ये जागृकता असणं आवश्यक आहे.

कॅन्सरचं वेळीच निदान झालं तर या आजारावरही मात करता येऊ शकते. यामध्ये आज औषधोपचार आणि निदान पद्धतीमध्येही मोठे बदल झाल्याने अनेकांचं जीवन पुन्हा पूर्ववत करण्यासाठी मदत होत आहे.4 फेब्रुवारी 2000 रोजी फ्रान्समधील पॅरिस येथे न्यू मिलेनियमसाठी जागतिक कर्करोग परिषदे दरम्यान झाली. त्याच दिवशी, युनेस्कोचे तत्कालीन महासंचालक कोइचिरो मत्सुरा आणि फ्रान्सचे माजी अध्यक्ष जॅक शिराक यांनी कॅन्सर विरुद्ध पॅरिसच्या चार्टरवर सही केली. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस 'जागतिक कर्करोग दिवस' म्हणून साजरा केला जातो.

युनियन ऑफ इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलने (UICC) जागतिक कर्करोग दिन हा एक "जागतिक एकत्र येण्याचा उपक्रम" म्हणून घोषित केला आहे. याचा अर्थ असा आहे की, जगभरातील व्यक्तींनी एकत्र येऊन कर्करोग रोग ओळखणे, काळजी घेणे आणि रोगाशी लढण्याचे त्यांना बळ देणे, तसेच या आजारावर मात करून पुन्हा आयुष्य नव्याने जिंकण्याची आशा देणे आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com