Vat Purnima 2023 Messages in Marathi : वटपौर्णिमा मराठी शुभेच्छा शेअर करून सौभाग्यवतींना द्या शुभेच्छा!

Vat Purnima 2023 Messages in Marathi : वटपौर्णिमा मराठी शुभेच्छा शेअर करून सौभाग्यवतींना द्या शुभेच्छा!

Vat Savitri Purnima 2023 wishes in marathi । मराठी महिन्यातील ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला 'वटपौर्णिमा' साजरी केली जाते.
Published by  :
Siddhi Naringrekar

Vat Savitri Purnima 2023 wishes in marathi । मराठी महिन्यातील ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला 'वटपौर्णिमा' साजरी केली जाते. हे तीन रात्रीचे व्रत आहे. शुद्ध त्रयोदशीपासून याची सुरुवात होते. मराठी महिन्यातील ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला 'वटपौर्णिमा' साजरी केली जाते. हे तीन रात्रीचे व्रत आहे. शुद्ध त्रयोदशीपासून याची सुरुवात होते. यंदा 3 जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

Vat Purnima 2023 Marathi Messages: मराठी महिन्यातील ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला 'वटपौर्णिमा' साजरी केली जाते. हे तीन रात्रीचे व्रत आहे. शुद्ध त्रयोदशीपासून याची सुरुवात होते. मात्र तीन दिवस उपवास करणे शक्य नसेल तर सौभाग्यवती पौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात. यंदा 3 जून रोजी वट पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

पतीला दीर्घायु्ष्य लाभावे आणि जन्मोजन्मी तोच पती मिळावा, हे या व्रताचे उद्दिष्ठ आहे. या दिवशी सौभाग्यवती महिला वटवृक्षाची पूजा करतात. वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून सात फेऱ्या मारतात. वडाच्या पानात फळाने सजवलेले वाण प्रथम वडाला वाहतात. नंतर पतीला देऊन नमस्कार करतात. त्यानंतर सौभाग्यवती एकमेंकींना हे वाण देतात. पूर्वीच्या काळी सर्व महिला एकत्र जमून वटवृक्षाची पूजा करत असतं. शहरीकरणानंतर वटाची फांदी घरोघरी पूजली जावू लागली. मात्र अजूनही काही ठिकाणी वडाभोवती एकत्र जमून पूजा केली जाते.

वटपौर्णिमा शुभेच्छा

सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण

बांधुनी जन्मोजन्मीचे बंधन

करते सातजन्माचे समर्पण

वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

जन्मोजन्मी असाच तुमचा सहवास लाभो मला

वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

सप्तपदींच्या सात फेर्‍यांनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,

जन्मोजन्मी राहो असेच कायम,

कोणाचीही लागो ना त्याला नजर या संसाराला,

दरवर्षी अशीच येवो ही वटपौर्णिमेची घडी कायम

वटपौर्णिमेच्या सौभाग्यवतींना शुभेच्छा!

सण आहे सौभाग्यचा,

बंध आहे अतूट नात्याचा

या शुभदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

वटपौर्णिमेच्या व्रतामागे सावित्री-सत्यवान यांच्या प्रेमाची, निष्ठेची कथा सांगितली जाते. परंतु, वटपौर्णिमेच्या पूजेमागे काही शास्त्रीय दाखले देखील आहेत. वाण देण्यात ‘दुसऱ्याला उपहारातून आनंद देण्याचा प्रकार आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्याचा संदेश आहे. त्यामुळे याची जाणीव ठेवून केलेली वटपौर्णिमा अधिक लाभदायी ठरेल.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com