केरळमध्ये साजरा करण्यात येणारा 'ओणम' काय आहे? काय आहे या उत्सवाची खासियत

केरळमध्ये साजरा करण्यात येणारा 'ओणम' काय आहे? काय आहे या उत्सवाची खासियत

'ओणम' हा दक्षिण भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी पृथ्वीवर परत येतो अशी एक आख्यायिका सांगितली जाते. हा सण जगभरातील मल्याळम बांधवांकडून धुमधडाक्यात साजरा केला जातो. 'ओणम' म्हणजे केरळच्या नवीन वर्षाची सुरुवात.

बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी पृथ्वीवर परत येतो अशी एक अख्यायिका सांगितली जाते. बळीराजा आपल्या न्यायीपणाबद्दल, पराक्रमाबद्दल आणि प्रजेवरील प्रेमाबद्दल प्रसिद्ध होता. त्यामुळे त्याच्या आगमनाचा उत्सव हा ओनमच्या स्वरुपात साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी सर्व लोक नवनवीन कपडे परिधान करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी लोक पहाटे स्नान करुन देवदर्शन करतात. पुक्काळम् (फुलांची रांगोळी) हेही एक आकर्षण. प्रत्येक घरासमोरील अंगण शेणाने सारवले जाते आणि भलीमोठी रांगोळी काढली जाते. ओनमच्या निमित्ताने पारंपरिक खाद्यपदार्थ आणि गोड मेजवानीचाही बेत आखतात. पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषत: केरळचे पारंपरिक नृत्य कथकली आणि पुलीकलीचे आयोजन केलं जातं. शेतकऱ्यांच्या घरी धन-धान्यांची आरास येऊ दे यासाठीही आजच्या दिवशी पूजा करण्यात येते.

या दिवसाला 'थिरुवोणम' असं म्हणतात. यंदा ओनमचा हा सण आज 8 सप्टेंबरला साजरा केला जातं आहे. 'थिरुवोणम' शब्द 'थिरु' आणि 'ओनम' दोन शब्दांचा मिळून तयार झाला आहे. यामध्ये 'थिरु' शब्दाचा अर्थ पवित्र असा आहे. दुसऱ्या एक अख्यायिकेनुसार, या दिवशी भगवान विष्णूच्या वामन अवताराचा जन्म झाला होता. ओनम मल्याळम कॅलेंडरमधील चिंगम महिन्यामध्ये येणार सण आहे. मल्याळम बांधव वर्षातील महिला महिना ओनम सणाद्वारे साजरा करतात. दहा दिवस चालणाऱ्या या सणानिमित्त घराची साफसफाई करून सजावट केली जाते. या दिवशी केरळमध्ये नौका शर्यतीचंही खास आकर्षण असतं. याशिवाय बैलांच्या शर्यतीही आयोजित केल्या जातात. ओनम हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या काळात पीक कापणीचा हंगाम सुरु असतो. शेतकरी पिकाची पूजा करतात.

Lokshahi
www.lokshahi.com