National Doctor’s day : 1 जुलै रोजीच 'जागतिक डॉक्टर्स दिवस' का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास
National Doctor’s day : आपल्या समाजात डॉक्टरांना (Doctor) मोठा दर्जा दिला जातो. तो जीवनाचा रक्षणकर्ता मानला जातो. अलीकडेच, कोरोना महामारीच्या काळात जगभरातील डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता पीडितांवर उपचार केले. आजचा दिवस म्हणजेच १ जुलै देशभरात डॉक्टर्स डे (National Doctor’s Day 2022) म्हणून साजरा केला जातो. जगभरात डॉक्टर्स डे आपआपल्या देशांमध्ये वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो.
बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय रॉय यांच्या स्मरणार्थ 1 जुलै 1991 रोजी भारतात प्रथमच 'राष्ट्रीय डॉक्टर दिन' साजरा करण्यात आला. मानवतेच्या सेवेत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. रॉय हे उत्तम डॉक्टर होते. शिक्षक असण्यासोबतच ते सक्रिय सामाजिक कार्यकर्तेही होते. त्यांनी 14 वर्ष पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणूनही काम केले. डॉ. रॉय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला. त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने म्हणजेच 1 जुलै रोजी 'राष्ट्रीय डॉक्टर्स दिन' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
डॉक्टर आपल्यासाठी देवदूतच आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणत्याही परिस्थितीत रुग्णाचा जीव कसा वाचविण्याचा प्रयत्न करतो. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे दरवर्षी 1 जुलै रोजी 'राष्ट्रीय डॉक्टर दिन' साजरा केला जातो. रुग्णाला परत जीवन देणाऱ्या डॉक्टरांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो.